Deepali Nagwade sakal
पुणे

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पाठिंबासाठी बाभूळसर बुद्रुकच्या सरपंच दिपाली नागवडे यांचा राजीनामा

मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बाभूळसर बुद्रुक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने युवक व ग्रामस्थ यांनी ग्रामसेवक व सरपंच यांना निवेदन दिले.

दत्तात्रेय कदम

मांडवगण फराटा - बाभुळसर बुद्रुक (ता. शिरूर) येथे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बाभूळसर बुद्रुक (ता. शिरूर) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने युवक व ग्रामस्थ यांनी ग्रामसेवक व सरपंच यांना निवेदन दिले.

यावेळी गावच्या सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा ग्रामसेवक गायकवाड भाऊसाहेब यांच्याकडे सुपूर्द केला.

"मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे मुलांना शैक्षणिक व नोकरी मिळवण्यासाठी पात्रता असूनही संधी मिळत नाही. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी सरपंचपदाचा राजीनामा ग्रामसेवक गायकवाड भाऊसाहेब यांच्याकडे देत आहे.

तसेच सरकारने लवकर मराठा समाजाला आरक्षण देऊन समाजाची होणारी शैक्षणिक व नोकरीमध्ये होणारी अवहेलना थांबविली पाहीजे.' असे सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांनी सांगितले.

यावेळी माजी सरपंच गणेश मचाले, उपसरपंच सुनील देशवंत, हनुमंत पाटोळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अरुण नागवडे, सुनील तुकाराम नागवडे, दिलीप नागवडे, हरिदास ढमढेरे, संतोष नागवडे, निरंजन नागवडे, प्रीती नागवडे, मोहिनी रणदिवे, विलास गवळी, मनोज मचाले, महेंद्र नागवडे, सतीश नागवडे, प्रशांत नागवडे, महादेव नागवडे, विठ्ठल नागवडे, ज्ञानेश्वर नागवडे, दादा भगत, सचिन जाधव, महेश नागवडे, अक्षय नागवडे, आकाश नागवडे, अनिकेत शितोळे, पंकज नागवडे, सागर नागवडे, सुमित नागवडे आदी उपस्थित होते.

तसेच आंदोलन काळात आत्महत्या केलेल्या आंदोलकांना सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष अरुण नागवडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्लाउद्दीन अलवी व आभार संतोष नागवडे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026: Mumbai Indians च्या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं उचललं मोठं पाऊल; जगभरातील चाहत्यांना बसला धक्का, नेमकं काय केलं?

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

IPL 2026 : केन विलियम्सन, LSG चा नवा मुख्य प्रशिक्षक? रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली आलेल्या अपयशानंतर संजीव गोएंका मोठा निर्णय घेणार

SCROLL FOR NEXT