Manoj Jarange Patil esakal
पुणे

Pune News : मनोज जरांगे यांच्यासह मराठा समन्वयकांविरुद्ध गुन्हा दाखल

वाघोलीतील मराठा आरक्षण सभा, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी आदेश लागू असताना पुण्यातील वाघोली परिसरात पहाटे विनापरवाना सभा घेतल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह सभेचे आयोजक आणि समन्वयकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिस नाईक रितेश दिलीप काळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून जरांगे पाटील यांच्यासह समन्वयक आणि आयोजक गणेश म्हस्के, संदीप कांबिलकर, शेखर पाटील आणि इतर आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी (जि. जालना) येथून हजारो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने जात होते. त्यांचा २३ जानेवारी रोजी रात्री वाघोली परिसरातील चोखी ढाणी येथील मैदानावर मुक्काम होता. या मैदानावर मुख्य सभेचे आयोजन करण्यात आले होते.

वाघोलीतील मराठा समन्वयक आणि आयोजकांनी सभेच्या परवानगीसाठी लोणीकंद पोलिस ठाण्यात अर्ज केला होता. परंतु पुणे पोलिस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी आयोजकांना पहाटे ध्वनिवर्धक लावण्यास आणि सभा घेण्यास मनाई केली होती. प्रत्यक्षात जरांगे पाटील वाघोलीत २४ जानेवारी रोजी पहाटे चार वाजता सभा घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक लावण्यास मनाई आहे. परंतु आयोजकांनी विनापरवाना ध्वनिवर्धक लावून, विनापरवाना सभा घेऊन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Army Success Story: कष्टाच्या जाेरावर भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी अभिषेक बिडकर; १३ लाख विद्यार्थ्यांमधून यशाला गवसणी, आई-वडिलांच्या डाेळ्यात पाणी!

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Baramati News: कृषी फीडरवरील वीजपुरवठा सलग पाच दिवस खंडित; ग्रामीण भागात संताप

SCROLL FOR NEXT