Manoj Jarange Patil esakal
पुणे

Maratha Reservation : लेकराबाळांच्या भविष्यासाठी मुंबईला या जरांगे पाटील यांची भावनिक साद

कायद्यामध्ये सगेसोयरे शब्द समाविष्ट करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे या एका मागणीसाठी मुंबईला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कायद्यामध्ये सगेसोयरे शब्द समाविष्ट करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे या एका मागणीसाठी मुंबईला जात आहे. मुंबईत शांततेत आंदोलन करणार आहे, पण छाताडावर गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही. तुम्हीही आपल्या लेकराबाळांसाठी एकदा घराच्या बाहेर पडा, मुंबईला या अशी संधी पुन्हा येणार नाही अषी भावनिक साद मनोज जरांगे पाटील यांनी घातली.

रात्री साडेनऊच्या सुमारास जरांगे पाटील यांनी औंधमध्ये मराठा समाजाशी संवाद साधला. त्यांच्या भाषणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

जरांगे पाटील म्हणाले, 'गरीब श्रीमंत मराठे पैसे खर्च करून पोरांना शिकवत आहेत पण आरक्षण नसल्याने संधी मिळत नाही. ज्यांना संधी मिळाली ते पुढे निघून गेले. आपण कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण मागत आहोत. परंतु आपल्याला संघर्ष रात्रंदिवस संघर्ष करावा लागत आहे. आता छाताडावर गोळ्या चालल्या तरी आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही.

राज्यभरात ५४ लाख मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. पण प्रमाणपत्र देत नाहीत. एका नोंदीवर संपूर्ण गणगोताला ओबीसी आरक्षण मिळू शकते. सोयरे शब्दासाठी कायद्यात बदल करावा यासाठी मुंबईत जात आहे, मुंबईवर धडक मारा देशाला शक्ती दाखवा, आंदोलन शांततेत पण मुंबईच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये मराठाच दिसला पाहिजे. असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

विरोधकांच्या टोळ्या बंद पडल्या

भाषण सुरू असताना छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली . त्यावर पाटील म्हणाले, तुम्ही त्याचे नाव घेऊ नका, तो जातीजातीत विष पेरणारा आहे, एकदा आरक्षण मिळू द्या त्याचा कार्यक्रम करतो, मी अशा सगळ्या विरोधकांच्या टोळ्या बंद पडल्या आहेत, अशा शब्दात हल्ला चढविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT