Tanaji Sawant sakal
पुणे

Maratha Reservation : धनादेशांचं वाटप! आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या 35 जणांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत

'मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होणे ही बाब दुःखद आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर कोण त्या कुटुंबाकडे पाहत नाही.

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज - आरक्षणासाठी आत्महत्या हा अंतिम पर्याय नाही. सरकार त्यांचे काम करत राहील, मात्र मराठा तरुणांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे मत राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या ३५ जणांच्या कुटुंबीयांना सावंत यांच्या भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते देण्यात आली. त्यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी धनगर समाजातील दोन आत्महत्याग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांनाही मदत करण्यात आली.

सावंत म्हणाले, 'मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होणे ही बाब दुःखद आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर कोण त्या कुटुंबाकडे पाहत नाही. आरक्षण आज किंवा उद्या मिळेल आणि विषय संपेल. परंतु, कुटुंब सावरण्यासाठी कळकळीची विनंती आहे की, टोकाचा निर्णय घेऊ नका. हा लढा कशासाठी सुरू आहे ते पहा, शासन आपला निर्णय घेईल. मराठा समाज माझा असून आत्महत्या, आरक्षण हे अंतिम साध्य नाही.

आत्महत्या केलेल्या ३५ कुटुंबातील व्यक्तींना आधार देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपये आणि दिवाळी फराळ देण्यात येत आहे. संबधित कुटुंबातील मुले यांचे शैक्षणिक पालकत्व आणि मुले व मुलींचे लग्नापर्यंतचा खर्च मी आजपासून उचलत आहे.' मागील दोन महिने आरक्षणाबाबत विविध राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत आहेत.

मागील वेळी देखील मराठा आरक्षण साठी ५८ मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्यात आले. या दरम्यान ४२ जणांनी आत्महत्या केली. आत्महत्या करणे हा योग्य मार्ग नाही. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणे चुकीचे आहे. अचानक एखादे वादळ यावे तसे आरक्षण आंदोलने सुरू झाली, असल्याचे मतही सावंत यांनी व्यक्त केले.

मराठा समाजातील मुलांनी समाजासाठी बलिदान दिले आहे. मला अत्यंत दुःख वाटते की, संबधित समूहातील कुटुंबाशी कशी चर्चा करायची? परंतु, समाज प्रबोधन करुन आत्महत्येचा विचार दूर करणे गरजेचे आहे. आत्महत्या हा योग्य मार्ग नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढा देण्यास शिकविले आहे. राज्यात आत्महत्या होणे योग्य नाही. महाराजांची शिकवण लढण्याची आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण काम केले पाहिजे. जीवनात अनेक संकटे येत असतात. पण, त्यांना सामोरे जाताना लढणे गरजे असल्याचे समाजातील लोकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT