Datta Ganjale Sakal
पुणे

Maratha Reservation : माजी सरपंच दत्ता गांजाळे यांचे आमरण उपोषण आज स्थगित

सरकारने दिलेल्या मुदतीत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा आमरण उपोषण करावे लागेल; गांजाळे यांनी दिला इशारा.

डी. के. वळसे पाटील

मंचर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मंचर (ता.आंबेगाव) येथील माजी सरपंच दत्ता गांजाळे गेली सहा दिवस आमरण उपोषणाला बसले होते. त्यांनी शुक्रवारी (ता. ३) दुपारी बारा वाजता उपोषण स्थगित केले. सरकारने दिलेल्या मुदतीत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा आमरण उपोषण करावे लागेल.' असा इशारा गांजाळे यांनी दिला.

मंचर येथेछत्रपती शिवाजी महाराज चौकात राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अँड सुनिल बांगर, अंकुश लांडे पाटील, अजय घुले, वसंतराव बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली गेली नऊ दिवस साखळी उपोषण सुरु होते. गेल्या सहा दिवसापासून गांजाळे यांनी आमरण उपोषण सुरु केले होते.

गुरुवारी (ता.२) रात्री मराठा समाज आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर शुक्रवारी साखळी उपोषणाची सांगता करण्यात आली.मंचर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी गोविंद जाधव, प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार सचीन मुंढे , सुनिल बांगर, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या हस्ते सरबत दिल्यानंतर गांजाळे यांनी उपोषण स्थगित केल्याचे जाहीर केले. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ आदी घोषणा देण्यात आल्या.

यावेळी देवदत्त निकम, सुरेश भोर, प्रवीण मोरडे, संदीप बाणखेले, सुहास बाणखेले, सुरेश निघोट, गणेश खानदेशे मालती थोरात, अश्विनी शेटे, संगिता बाणखेले, राजश्री गांजाळे उपस्थित होते. सुनील बांगर, अकुश लांडे, वसंतराव बाणखेले, आशिष पुंगलिया यांची मनोगते झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT