Manoj Jarange Patil Sakal
पुणे

Maratha Reservation : आरक्षणाबाबत २४ डिसेंबरच्या आत सरकार निर्णय घेईल - मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणाबाबत २४ डिसेंबरच्या आत सरकार निर्णय घेईल. योग्य निर्णय नाही घेतल्यास पुढचं आंदोलन सरकारला परवडणार नाही.

जयराम सुपेकर

सुपे - मराठा आरक्षणाबाबत २४ डिसेंबरच्या आत सरकार निर्णय घेईल. योग्य निर्णय नाही घेतल्यास पुढचं आंदोलन सरकारला परवडणार नाही. असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सुपे (ता.बारामती) येथे बोलताना दिला.

गुरुवारी (ता. १६) सायंकाळच्या दरम्यान, श्री. जरांगे यांनी सुप्याला धावती भेट दिली. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. जेसीबीच्या सहाय्याने येथील कार्यकर्त्यांनी त्यांना मोठा हार घालून स्वागत केले. तसेच, सन्मानपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चा सुपे परगण्याच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मराठ्यांना आरक्षण मिळेलच. आरक्षण मिळाल्यानंतर एक दिवस सुप्यासाठी नक्की देईन. आज अचानक जाता जाता भेटायला आलो आहे. असे सांगून श्री. जरांगे पुढे म्हणाले - आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. सरकारला कायदा पारित करण्यासाठी आधाराची आवश्यकता आहे. लाखात नोंदी सापडल्या आहेत.

याचा अहवाल सरकार स्वीकारून २४ डिसेंबरच्या आत राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळेल. सरकार कुणबी जात प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करून ५०% च्या आत मराठ्यांना आरक्षण मिळेल, असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.

श्री जरंगे म्हणाले - जीवातजीव आहे तोपर्यंत आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही. एक डिसेंबर पासून गावागावात साखळी उपोषण करा, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. सुपे पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मराठा समाजाने व्यसनापासून दूर राहावे

श्री. जरांगे यांचे भाषण चालू असताना उपस्थितांमधून काही जण बडबड करत होते. यावर ते म्हणाले - प्रत्येक गावात दोन-चार असे नमुने असतातच. पण माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की, त्यांनी गावातल्या अशा व्यसनी माणसांची यादी करावी आणि त्यांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी विनंती करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT