dattatray bharne home agitation by maratha community sakal
पुणे

Maratha Reservation : इंदापूरात आमदार भरणे यांच्या घरासमोर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

सकल मराठा समाजाच्या वतीने भरणेवाडी (ता.इंदापूर) येथील आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या निवास्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

राजकुमार थोरात

वालचंदनगर - मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या अधिसुचनेचे रुपांतर शासन निर्णयामध्ये करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने भरणेवाडी (ता.इंदापूर) येथील आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या निवास्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. भरणे यांनी सगे-सोयरे या शब्दाचा अंतर्भाव असलेल्या अधिसुचनेचे शासन निर्णयामध्ये रुपातंर करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन व उपोषण स्थगित केले.

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावोगावी आंदोलने होवू लागली आहे. इंदापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज शनिवार (ता.१७) रोजी भरणेवाडीमध्ये ठिय्या आंदोलन सुरु करुन पवन घोगरे, रोहित पाटील, महादेव सोमवंशी, सोमनाथ जाधव यांनी आमरण उपोषणला सुरवात केली होती.

दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आमदार दत्तात्रेय भरणे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच २० फेब्रुवारीच्या विशेष आंदोलनामध्ये आरक्षणाबाबतचे विधेयक व मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मराठा समाजच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य कराव्यात.

तसेच सगे-सोयरे या शब्दाचा अंतर्भाव असलेल्या अधिसुचनेचे शासन निर्णयामध्ये रुपातंर करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे केल्यानंतर आंदोलन कर्त्यांनी आंदोलन स्थगित केले.

भरणे यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठविण्याची मागणी..

यावेळी मराठा समाजाच्या युवकांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांच्याकडे अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आवाज उठविण्याची तसेच अधिवेशनाच्या पाऱ्यावरती बसून आंदोलन करण्याची मागणी केली असल्याचे सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

कडक पोलिस बंदोबस्त...

इंदापूर पोलिसांनी मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांना इंदापूरमध्ये आंदोलन करुन निवेदन द्यावे असे सांगितले. मात्र मराठा समाजाचे आंदोलनकर्ते भरणेवाडीमध्ये आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यावर ठाम असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वालचंदनगर पोलिसांनी भरणेवाडी परीसरामध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT