Manoj Jarange Patil Sakal
पुणे

Maratha Reservation : आता जगायचे ते मराठ्यांच्या लेकरांसाठीच- मनोज जरांगे पाटील

दिवसभराच्या प्रतिक्षेनंतर पिंपरी चिंचवड हद्दीत मराठा पदयात्रेचे जंगी स्वागत

प्रशांत पाटील

जुनी सांगवी - दिवसभराच्या प्रतिक्षेनंतर रात्री दहाच्या सुमारास पिंपरी चिंचवड हद्दीत मराठा पदयात्रा पोचली.या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे फुलांची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले . सांगवी फाटा येथील भाषणात जरांगे पाटील म्हणाले.

आमचा लढा सुरूच राहणार आहे सत्तर वर्ष मराठा समाजाला मूर्ख बनविण्याचे काम सरकारने केले. आम्ही षडयंत्रला घाबरत नाहीत. आमच्या मराठा लेकरांसाठी हा लढा शेवटपर्यंत घेवुन जावू. ही लढाई जिंकायची म्हणजे जिंकायचीच कोणीही आडवा आला तरी त्याला आडवा करू, आत्ता जगायचे ते फक्त मराठ्यांच्या लेकरांसाठीच्या न्याय हक्कासाठीच.

मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रा पिंपरी चिंचवड शहरातून जात असताना पिंपरी चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या सांगवी फाटा येथून संपूर्ण रस्त्यावर पदयात्रेतील मराठा समाज बांधवांसाठी ठिकठिकाणी सेवा व्यवस्था करण्यात आली.

बुधवार ता.२४ सकाळी ९ वाजल्या पासून जुनी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, दापोडी, नवी सांगवी परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने पदयात्रेच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली होती. रात्री दहाच्या सुमारास औंध राजीव गांधी पुलावरून पदयात्रेचे पिंपरी चिंचवड शहर हद्दीत आगमन झाले. दिवसभर सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सांगवी फाटा, रक्षक चौक, जगताप डेअरी, काळेवाडी फाटा चौकांमधून स्वागत कमानी, कॉर्नर स्टेज उभारण्यात आले होते.

खराडी येथून पदयात्रा निघून सकाळी १० पर्यंत सांगवी फाटा येथे पोचणार असल्याचे निरोप कळविण्यात आल्याने सकाळपासूनच सकल मराठा बांधवांकडून व्यवस्थेची लगबग सुरू होती. यात विविध सामाजिक संघटना, राजकीय मंडळीनी स्वागताची जय्यत तयारी पदयात्रा मार्गावर करण्यात आली.

सांगवी फाटा ते रक्षक चौक जगताप डेअरी मार्गावर अल्पोहार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खिचडी, केळी वाटपासाठी ठेवण्यात आल्या होत्या. सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. चलो मुंबई , एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सकाळपासूनच पिंपरी चिंचवड शहर वाहतूक पोलिस विभागाकडून रहदारीसाठी चोख व्यवस्था व बंदोबस्त ठेवण्यात आला.

पॉईंटर -

सांगवी फाटा ते डांगे चौक दरम्यान ठिक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने जेसीबी, फुलांनी भरलेले ट्रॅक्टर उभा करण्यात आले होते.

- ढोलवाद्यांच्या गजरात स्वागत करण्यासाठी परिसरातील विविध ढोलताशा पथकांना पाचारण करण्यात आले होते.

- पदयात्रेतील पाच हजार बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था सांगवी फाटा दरम्यान मार्गावर पाचशे डझन केळी,नाष्टा,पाणी बाटली, बाॅक्स , साधारण एक हजार भगव्याटोप्या, ताफ्यातील बैलगाडीच्या बैलांसाठीही खुराक इ. व्यवस्था मार्गावर करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT