Manoj Jarange Patil Sakal
पुणे

Maratha Reservation : गोळ्या झाडल्या तरी चालतील, हटणार नाही - जरांगे यांचा इशारा

‘देव आले तरी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याशिवाय आता कोणीही रोखू शकत नाही. ७० वर्षे मराठे आपल्या हक्कापासून दूर राहिले. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘देव आले तरी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याशिवाय आता कोणीही रोखू शकत नाही. ७० वर्षे मराठे आपल्या हक्कापासून दूर राहिले. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. गोळ्या झाडल्या तरी चालतील. पण आरक्षण घेऊनच राहणार. मराठा वादळ काय आहे हे आता मुंबईत कळेल,’’ असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी वाघोलीत पहाटे ४.३० वाजता झालेल्या सभेत दिला. भर कडाक्याच्या थंडीत सभेला हजारोंची उपस्थिती होती.

रांजणगाव येथून आज पहाटे ४.२० मिनिटांनी जरांगे पाटील यांचे वाघोलीतील मुक्कामाच्या ठिकाणी आगमन झाले. मैदानात येताच त्यांनी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभेला सुरुवात केली. जरांगे पुढे म्हणाले, ‘सरकारला सांगत होतो मराठ्यांच्या नादी लागू नका. आरक्षणाचा अध्यादेश काढण्यासाठी सरकारला मुदतवाढ दिली. मात्र त्यांनी चालढकल केली. ओबीसीतून आरक्षण हा मराठ्यांचा हक्क आहे. तो मिळवणारच.

कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर सापडल्या. एवढ्या नोंदी असूनही मराठ्यांना आरक्षण नाही आणि ज्यांची कोणतीही नोंद नाही, त्यांना आरक्षण दिले. नोंदी सापडल्या असल्या तरी अजून प्रमाणपत्र दिले नाही. एकाची नोंद आढळली तरी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आरक्षण मिळाले पाहिजे, ही आमची मागणी आहे.

मराठे वादळ कसे आहे, हे आता मुंबईत कळेल. ज्यांनी सोसले त्यांनाच कळते आरक्षण का गरजेचे आहे. पुढच्या पिढीला तरी त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. आता नाही तर पुन्हा नाही. म्हणून आता माघार नाही. असे सांगत त्यांनी प्रत्येक मराठ्याने मुंबईत दाखल व्हावे.’

छगन भुजबळ यांच्यावर टीका

मी त्यांना बोलत नव्हतो. पण त्यांनीच सुरुवात केली. ओबीसी व मराठा यांच्यात वाद घडविण्याच्या प्रयत्न केला. मात्र ते आम्ही घडू दिले नाही. त्यांची पात्रता पण नाही मराठ्यांच्या विरोधात बोलण्याची, अशी खरमरीत टीका त्यांनी भुजबळ यांच्यावर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT