manoj jarange  sakal
पुणे

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मंगळवार पासून राज्यात होणारे आंदोलन सरकारला झेपणार नाही - मनोज जरांगे पाटील

‘एक मराठा,लाख मराठा’ या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता.

डी.के वळसे पाटील

मंचर - “मराठ्यांच्या लेकरांनो गावागावात जाऊन मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करा.जाळपोळ व उद्रेक करायचा नाही.शांततेने आंदोलन करा.

हे युद्ध शांतता मार्गाने आपल्याला आरक्षण मिळवून देणारे आहे. हे युद्ध जिंकायचेच आहे. रविवारी (ता.२२) आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार आहे.

त्यानंतर मंगळवार (ता.२४) पासून होणारे आंदोलन सरकारला झेपणार व पेलणार नाही.” असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंचर (ता.आंबेगाव) येथे दिला.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व जिजाऊ माता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अँड.सुनिल बांगर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिवगिरी मंगल कार्यालय ते मंचर बसस्थानक परिसरात जुन्या पुणे-नाशिक रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारोंच्या जनसमुदायाने रस्त्यावर फुलांच्या पाकळ्या पसरवून जरांगे यांचे जंगी स्वागत केले.

‘एक मराठा,लाख मराठा’ या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विवेक वळसे पाटील, देवदत्त निकम,राजाराम बाणखेले, सुनील बाणखेले, अंकुश लांडे पाटील, अरविंद वळसे पाटील, प्रभाकर बांगर,अजय घुले, आनंदराव शिंदे, गोविंद खिलारी,प्रशांत बागल,संजय मोरे, साहेबराव मेंगडे, डॉ.दत्ता चासकर,बाबाजी चासकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. युवकांची उपस्थितीती मोठ्या संख्येनेहोती.

जरांगे पाटील म्हणाले “सध्या आपल्या लेकरांचे भवितव्य अंधारात आहे. त्यांचे स्वप्न साकार करायचे आहे.आरक्षणासाठी वाटेल ती किंमत मोजायची व वेदना सहन करायची तयारी आहे. पायाला हात लाऊन सांगतो अशी संधी आपल्याला परत नाही. आरक्षण देण्याबाबत मी चार दिवस मुदत दिली होती. पण सरकारने एक महिना वेळ माघून घेतली.

तोडगा काढायचा म्हणून जास्तीत जास्त वेळ दिला. आपण त्यांना अजून दहा दिवस जास्त दिले.आत्ता ४० दिवस झाले आहेत.जर आत्ता पुन्हा आंदोलन सुरु झाले तर ते सरकारला पेलवणार नाही. कारण प्रश्न मराठ्यांच्या अस्तित्वाचा आहे. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या कल्याणासाठी हे आंदोलन आहे.आत्महत्या करू नका.मी उपोषणाला बसलो त्यावेळी सर्व मंत्रिमंडळ बसून होते.माझ्याकडून कधीही गद्दारी होणार नाही. मराठ्यांचे आंदोलन हाणून पाडण्याची ताकद कोणतही नाही. आरक्षण मान्य होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT