junner  sakal
पुणे

Maratha Reservation : शिवरायांचे जन्मस्थान हे संघर्ष आणि ऊर्जेचे स्थान, ही प्रेरणा घेऊन पुढे जाणार : जरांगे पाटील

मराठा समाजातील प्रत्येक तरुणाने घरा-घरात जाऊन आरक्षण कशासाठी मागतोय सांगुन जनजागृती करावी

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर - आरक्षणाचे आंदोलन गालबोट लागून हिसंक होणार नाही याची काळजी घेताना मराठा तरुणांनी आत्महत्येचे विचार मनात आणू नये अशी कळकळीची विनंती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारंगे पाटील यांनी येथे केली. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पंचलिंग रस्ता चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाला उद्देशून ते बोलत होते.त्यापूर्वी त्यानी शिवनेरीवरील शिवाई मातेचे दर्शन घेतले व शिवजन्मस्थळास वंदन केले.

जारंगे म्हणाले, मराठा समाजातील प्रत्येक तरुणाने घरा-घरात जाऊन आरक्षण कशासाठी मागतोय सांगुन जनजागृती करावी. आरक्षणाची चळवळ उभी राहण्यासाठी मदत करावी. तुमचं हे लेकरू तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान संघर्ष आणि ऊर्जेचे स्थान असल्याने ही प्रेरणा घेऊन पुढे जात आहे असे जारंगे म्हणाले

आपल्याला आरक्षणासाठीचे आंदोलन शांततेच्या मार्गाने करायचे आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही.२४ ऑक्टबरपर्यंत तारखे पर्यंत सरकारची वाट पाहिली जाईल.त्यानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल असेही जारंगे यांनी स्पष्ट केले.

यावेळी परिसरातील सकल मराठा समाज तसेच राजकीय पक्षाचे नेते,लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फटाक्यांच्या आतषबाजीने, झाज पथकाच्या निनादात, फुलांची उधळण करीत जारंगे यांचे समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व आरक्षणाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.व्यासपीठावर मुलींनी शिवप्रतिमा देऊन स्वागत केले.सकल मराठा समाज शिवजन्मभूमी जुन्नरच्या कार्यकर्त्यांनी नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT