Maratha Reservation market yard agitation sakal
पुणे

Maratha Reservation : मार्केट यार्डात शुकशुकाट; आडते, कामगार संघटना व्यापारी वर्गाकडून बंद पाळला

मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, कांदा बटाटा बाजार बंद ठेवण्यात आला होता.

प्रवीण डोके @pravindoke007

मार्केट यार्ड - मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, कांदा बटाटा बाजार बंद ठेवण्यात आला होता. अडते असोसिएशन, फुल बाजार अडते असोसिएशन, कामगार युनियन यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसाचे सामूहिक साखळी उपोषण केले.

बुधवारी मार्केट यार्डातील सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आल्याने बाजार आवारात शुकशुकाट होता. मार्केट यार्डसह, फुल बाजार तसेच मध्यभागताील महात्मा फुले मंडईतील व्यापाऱ्यांनीही बंद पाळला. यावेळी बाजार समितीचे संचालक अनिरुद्ध (बापू) भोसले, गणेश घुले, संतोष नांगरे, अडते असोसिएशनचे सचिव करण जाधव, तात्या कोंडे, रोहन जाधव, विलास थोपटे, नितीन जामगे, राहुल कोंढारे यांच्यासह मार्केटयार्डातील घाऊक फळ, पालेभाजी बाजार, तसेच फूल बाजारातील अडते मोठ्या संख्येने सहभागी होत जोरदार घोषणाबाजी केली.

मार्केट यार्डासह मध्यभागातील महात्मा फुले मंडईतील किरकोळ विक्रेत्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवले होते. एरवी गजबजलेल्या मार्केट यार्ड, मंडई परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. दोन दिवसांपूर्वीच बाजार घटकांतील व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीला बंद बाबत निवेदन देण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बुधवारी शेतीमालाची आवक झाली नाही. बंदला शेतकऱ्यांच्यासह व्यापारी बंद मध्ये सहभागी होत पाठिंबा दिला.

मराठा आरक्षणाला शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिला असल्याचे दिसत होते त्यामुळे आज गुलटेकडी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचाही माल आला नाही. नियमानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करता येत नसल्याने फळबाजार आणि भुसार बाजार सुरू ठेवण्यात आला होता. बाजारात फळ-भाज्यांच्या 14 गाड्या आल्या होत्या. तो माल स्वतः शेतकऱ्यांनी विकला. अडते, व्यापारी, कामगार यांनी मात्र बंद पुकारला होता.

- दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : दीदी, पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा, स्टेटस ठेवून लेकीच्या पहिल्याच वाढदिनी पोलीस बाप बेपत्ता; स्वत:लाच वाहिली श्रद्धांजली

CM Devendra Fadnavis : विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांना प्राधान्य; विरोधकांनीही सकारात्मकता दाखविण्याचे आवाहन

Stock Market Today : शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स तब्बल 300 अंकांनी खाली; मात्र हा IPO सुसाट; कोणते शेअर्स घसरले?

Kolhapur Major Accident : कोल्हापूरात भीषण अपघात! एसटी-दुचाकी धडकेत एक ठार; जोरदार धडकेत एसटीच्या काचा फुटल्या

Goa : पत्नीला वाचवलं, तिच्या बहिणींना वाचवायला गेलेल्या पतीचा अन् ३ बहिणींचा मृत्यू; कुटुंबातल्या चौघांचा अंत

SCROLL FOR NEXT