Maratha Reservation Sakal
पुणे

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात महिलांचा सहभाग वाढला...

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरील आंदोलनात आता महिलाही सक्रीयपणे उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

मिलिंद संगई, बारामती

बारामती - मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जसा विलंब होतो आहे, त्या विलंबासोबतच आंदोलनाची धार अधिकच तीव्र होत आहे. बारामतीत सुरु असलेल्या लाक्षणिक उपोषणाच्या ठिकाणी आज महिलांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरील आंदोलनात आता महिलाही सक्रीयपणे उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

प्रशासकीय भवनासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लाक्षणिक उपोषण सुरु आहे. दररोज बारामती शहरासह तालुक्याच्या विविध भागातून मराठा बांधव भगिनी येत या ठिकाणी दिवसभर उपोषण करतात.

गुरुवारी (ता. 2) मराठा समाजातील महिलांनी पाठिंबा देत उपोषण केले. मराठा आरक्षणाबाबत महिलांनी जोरदार घोषणाही दिल्या. दरम्यान बुधवारी (ता. 1) रात्री एमआयडीसी परिसरामध्ये मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मशाल मोर्चामध्येही महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मराठा आरक्षण मिळायलाच हवे असा आग्रह अनेकांनी या प्रसंगी बोलून दाखविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घातपात, हलगर्जीपणा की गुन्हेगारी कृत्य... अजित पवारांच्या मृत्यूमागे नेमकं काय? पत्रकार परिषदेत सीआयडीनं कोणते संकेत दिले? वाचा...

हृदयस्पर्शी Video: फुटबॉल लागून 'SEAGULL' पक्षी कोसळला, खेळाडू त्वरित मदतीला धावला... CPR देऊन वाचवले प्राण...

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

Explained : दक्षिण आफ्रिककडून वेस्ट इंडिजचा पराभव व्हावा, ही तर भारताची इच्छा! पण, का?

India Semi-Final Scenario: बापरे! भारताला तब्बल २९० धावांनी झिम्बाब्वेला हरवावं लागेल? नेमकं कसं आहे गणित, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT