पुणे

अंतरवालीत ‘ओबीसीं’चे प्रतिआंदोलन

CD

.....


अंकुशनगर (जि. जालना), ता. ६ : मराठा आरक्षणासंदर्भात प्रलंबित मागण्यांसाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मनोज जरांगे यांचे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आता ओबीसी समाजाकडूनही अंतरवालीतील सोनियानगरमध्ये प्रतिआंदोलनाला सुरवात झाली आहे. ॲड. मंगेश ससाणे, प्रा. विठ्ठल तळेकर, सतीश कुलाल, बाबासाहेब बटुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आजपासून (ता. सहा) उपोषण सुरू केले आहे.
ॲड. ससाणे म्हणाले, ‘‘जरांगे यांच्या उपोषणाच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकला जात आहे. मराठा समाजाला आतापर्यंत २२ लाख कुणबी दाखले देण्यात आले आहेत. मंत्री व मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड हे त्यांच्यासाठी पायघड्या टाकत आहेत. आम्ही आमचे हक्क आणि अधिकार टिकवण्यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत. आता ओबीसींची मंत्रिमंडळ समिती येथे येते का, हे आम्ही पाहणार आहोत.’’ एका आडमुठ्या माणसामुळे महाराष्ट्र वेठीस धरला जात आहे, असा आरोप ससाणे यांनी केला.
----

काही मंत्र्यांकडून षड्‍यंत्र
मागेल त्याला कुणबी दाखला देणार, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटल्याचा दाखला देत ससाणे यांनी ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्यासाठी काही मंत्री षड्‍यंत्र रचत असल्याचा आरोप केला. मात्र, ओबीसी समाज आपल्या मागण्या आणि भूमिका संविधानिक मार्गाने मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका समाजाला ‘स्पेशल ट्रीटमेंट’ देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT