shivajinagar
shivajinagar 
पुणे

#MarathaKrantiMorcha आंदोलनामुळे राज्यातील एसटी वाहतूक ठप्प

सचिन बडे

पुणे :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्रभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे. 

पुणे येथून कोल्हापूर-सांगली-सातारा, बीड-लातूर, मराठवाड्यातील प्रमुख शहरे, नाशिक-दादर आणि विदर्भातील काही शहरात होणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि अहमदनगर या शहरादरम्याची वाहतूक खबरदारीच्या कारणामुळे बुधवारी दुपारपर्यंत पूर्णपणे बंद केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

स्वारगेट : स्वारगेट बस स्थानकातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर स्वारगेटवरुन मुंबईकडे जाणाऱ्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सोलापूर मार्गही पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर-सांगली-सातारा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती. आगार व्यवस्थापक प्रदिपकुमार कांबळे यांनी दिली. 

पुणे रेल्वे स्टेशन  : पुणे रेल्वे स्टेशन बस स्थानकातून सकाळी पुणे-मुंबई मार्गावर एसटीच्या काही फेऱ्या झाल्या. मात्र आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे या मार्गावरील वाहतूक चार वाजेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आंदोलनाची तीव्रता कमी झाली तर चार वाजल्यानंतर काही प्रमाणात वाहतूक सुरू करण्यात येईल अशी माहिती. पुणे स्टेशन एसटी स्थानकातील वाहतूक नियंत्रक अशोक जोजाळ यांनी दिली. 

शिवाजीनगर  : शिवाजीनगर बस स्थानकातून औरंगाबादकडे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अहमदनगर मार्गही बंद ठेवण्यात आला आहे. बीड-लातूर आणि मराठवाड्याकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नाशिक-दादर मार्गावर काही ठिकाणी हिंसक घटना घडल्यामुळे, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर आगार प्रमुख एन. ए. बाबर यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT