dangal 
पुणे

#MarathaKrantiMorcha पिंपरी चिंचवड अघोषित बंदला हिंसक वळण 

संदिप घिसे

पिंपरी : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चिंचवडगाव येथे फक्‍त श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. मात्र सोशल मिडियावरून पिंपरी चिंचवड बंद असल्याचे मेसेज फिरत होते. चिंचवडच्या वाल्हेकरवाडी भागात एका टोळक्‍याने दहा ते बारा दुकानांवर दगडफेक करीत दहशत निर्माण केली. तर फुगेवाडी परिसरात बसवर दगडफेक करण्यात आली. यामुळे अघोषित बंदला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. 

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चिंचवडगावात श्रद्धांजली आणि निषेध सभा सुरू होती. तर दुसरीकडे चिंचवडच्या वाल्हेकरवाडी आणि गुरुद्वारा परिसरात एका टोळक्‍याने दहशत निर्माण करण्यासाठी दहा ते बारा दुकानांवर दगडफेक केली. त्यामध्ये एचडीएफसी बॅंकेच्या एमटीएम आणि नेहा मोटर्स कंपनीच्या शोरूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हेच टोळके चिंचवडच्या विविध भागांमध्ये फिरून बंदसाठी व्यापाऱ्यांना दमदाटी करीत होते. 
तर दुसरीकडे फुगेवाडी परिसरामध्ये पीएमपीएमएलच्या (एमएच-12-एफसी-3343) या बसवरही दगडफेक करण्यात आली. मात्र सुदैवाने यात कोणीही प्रवासी जखमी झालेला नाही. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांची पळापळ 
चिंचवड परिसरात श्रद्धांजली आणि निषेध सभा घेण्यात येणार होती. तर दुसरीकडे सोशल मिडियावर पिंपरी चिंचवड बंदचे आवाहन करणारे मेसेज फिरत होते. या मेसेजची दखल पोलिसांनी घेतली नाही. रविवार असल्याने अनेक वरिष्ठ अधिकारी सुट्टीवर होते. मात्र हिंसक घटना घडू लागल्याने त्यांची पुन्हा ड्यूटीवर येण्यासाठी पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price: साखर स्वस्त होणार? 2 लाख टन साखर घेऊन 4-5 जहाजे भारताकडे रवाना; सणासुदीपूर्वी मिळणार दिलासा

Chinchpoklicha Chintamani: 'चिंचपोकळीचा चिंतामणी' आला रे..., गणरायाची पहिली झलक समोर; पाहा Photos

ICICI Gold Loan Scam: बनावट सोन्यावर २३ कोटींची उधळण!; आठ जणांना अटक; आयसीआयसीआय बॅंक गोल्ड लोन घोटाळा

Maharashtra Monsoon Prediction : देशात अद्यापही दलितांसोबत भेदभाव, चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे कप - राहुल गांधी

SPPU Degree Certificate Checking: घरबसल्या करा पदवी प्रमाणपत्राची पडताळणी! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय; विद्यार्थ्यांचे हेलपाटे वाचणार

SCROLL FOR NEXT