अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी - ‘जीवनगौरव’ पुरस्कार स्वीकारताना बाबासाहेब पुरंदरे. या वेळी (डावीकडून) प्रमिला सूर्यवंशी, सुदाम भोरे, अरुणा ढेरे, पुरंदरे, विश्‍वास पाटील, लीनला मांडगुळकर-आंबेकर.
अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी - ‘जीवनगौरव’ पुरस्कार स्वीकारताना बाबासाहेब पुरंदरे. या वेळी (डावीकडून) प्रमिला सूर्यवंशी, सुदाम भोरे, अरुणा ढेरे, पुरंदरे, विश्‍वास पाटील, लीनला मांडगुळकर-आंबेकर. 
पुणे

गदिमांनी मराठीचे सौंदर्य वाढविले - डॉ. अरुणा ढेरे

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘‘गदिमांनी आपल्याला भावशुद्ध करणाऱ्या साहित्याचे देणे दिले आहे. मराठीचे सौंदर्य वाढवून आपल्यापर्यंत पोचविले आहे,’’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, गदिमा प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी यांच्यातर्फे भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयोजित राज्यस्तरीय गदिमा जन्मशताब्दी सोहळ्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ढेरे बोलत होत्या. ज्येष्ठ साहित्यिक विश्‍वास पाटील अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरीचे अध्यक्ष मुरलीधर साठे, कविवर्य नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, कवयित्री लीनला माडगूळकर-आंबेकर उपस्थित होत्या. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (गदिमा जीवनगौरव), लोककलावंत प्रमिला सूर्यवंशी (लोककला), अभिनेत्री स्मिता तांबे (कलागौरव), गझलकार नितीन देशमुख (काव्यप्रतिभा), थेरगावचे खिंवसरा पाटील विद्यालय व आळंदीतील श्री ज्ञानेश्‍वर विद्यालय (संस्कारक्षम शाळा), उद्योजक दत्तात्रेय दगडे व चंद्रकांत रासकर (उद्योगभूषण) यांचा गौरव केला. कादंबरी काळीज काटा (सुनील जवंजाळ, सातारा), काव्यसंग्रह पीळ (सुनील यावलीकर, अमरावती), सृजनभान (मानसी चिटणीस, चिंचवड), कालिंदीच्या डोहातून (किशोर मुगल, चंद्रपूर), जू (संदीप वाघोले, आळे फाटा) यांना गदिमा साहित्य पुरस्काराने गौरविले. कवी अरुण पवार, अनंत राऊत, देवा झिंजाड, प्रशांत केंदळे, रमझान मुल्ला, दिनेश भोसले यांना आम्ही गदिमांचे वारसदार पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT