drama esakal
पुणे

Martahi Drama : मराठी नाटकांना ‘अच्छे दिन’; पावसाळ्यातही प्रयोग ‘सुसाट’

मराठी व्यावसायिक रंगभूमीवर आजघडीला सुमारे तीस ते पस्तीस नाटके सुरू असून, अनेक नाटके लवकर रंगभूमीवर दाखल होणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मराठी व्यावसायिक रंगभूमीवर आजघडीला सुमारे तीस ते पस्तीस नाटके सुरू असून, अनेक नाटके लवकर रंगभूमीवर दाखल होणार आहेत. यातील बहुतांश नाटकांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे.

विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होऊनदेखील नाट्यप्रयोगांच्या संख्येत घट झालेली नाही. त्याचबरोबर कोरोनापश्चात उदयाला आलेला ‘वीकेंड रंगभूमी’चाही ट्रेंड ओसरत असून, आठवडाभर प्रयोगांची रेलचेल आहे. त्यामुळे ‘कोरोना’चे ग्रहण सुटून मराठी नाटकांना पुन्हा ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे.

कोरोनाकाळात दोन वर्षे नाट्यगृहांना टाळे असल्याने नाट्यप्रयोग थंडावले होते. पुन्हा नाट्यगृहे उघडल्यानंतर रसिक त्याकडे पूर्वीच्या असोशीने वळतील का, याबाबत कलाकार साशंक होते. दरम्यानच्या काळात दूरचित्रवाणी आणि ऑनलाइन माध्यमांसाठी चित्रीकरण सुरू असल्याने कलाकारही त्यात व्यग्र झाले होते. त्यामुळे पुन्हा नाट्यप्रयोग सुरू झाल्यानंतर केवळ शनिवार व रविवारी प्रयोग होऊ लागले.

कलाकारांनाही पाच दिवस चित्रीकरण आणि दोन दिवस नाटक, असे समीकरण सोयीचे होत होते. नाट्यरसिक येतील, याची खात्री नसल्याने निर्मातेही सोमवार ते शुक्रवारदरम्यान प्रयोग लावण्यास धजावत नव्हते. परिणामी, ‘वीकेंड रंगभूमी’चा नकोसा ट्रेंड स्थिरावतो का, अशी भीती नाट्यसृष्टीला भेडसावत होती.

मात्र, गेल्या काही महिन्यांत रसिकांच्या वाढत्या प्रतिसादाने हे चित्र बदलण्यास भाग पाडले आहे. ‘वीकेंड’चे प्रयोग उदंड गर्दीत पार पडत असल्याने गुरुवारी आणि शुक्रवारी सायंकाळी प्रयोगांचे आयोजन होऊ लागले. त्याचाही प्रतिसाद वाढत असल्याने आता आठवड्याचे सातही दिवस नाट्यप्रयोग होत आहेत. एरवी जून महिन्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने प्रयोगांची संख्या काहीशी रोडावते. मात्र, यंदा जुलै महिन्यात नियोजित असलेल्या प्रयोगांची संख्यादेखील लक्षणीय आहे.

सोमवार-मंगळवारच्या प्रयोगांना गर्दी झाली म्हणजे नाटक चालले, असे नाट्य व्यवसायात मानले जाते. आज आठ ते दहा नाटकांना आडवारी गर्दी होत आहे, म्हणजे नक्कीच नाटकांना ‘अच्छे दिन’ आहेत. जुलैमध्ये शाळा सुरू झालेल्या असताना आणि पावसाळा असताना इतक्या संख्येने नाट्यप्रयोग झाल्याचे दृष्य मी कित्येक वर्ष पाहिले नव्हते. आज वैचारिक, आशयघन, विनोदी अशा सर्व प्रकारच्या नाटकांना रसिकांची पसंती मिळते आहे.

- समीर हंपी, नाट्य व्यवस्थापक

प्रायोगिक रंगभूमीही बहरली

पुण्यात व्यावसायिक रंगभूमीप्रमाणेच प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकांचीही मोठी परंपरा आहे. अनुभवी कलाकारांसह नवोदित कलाकारही येथे विविध प्रयोग करून पाहण्यास उत्सुक असतात. त्यांच्या प्रयोगशील कलाकृतींनाही नेहमीप्रमाणे पुणेकर रसिक उत्तम प्रतिसाद देत आहेत.

खास अशा नाटकांसाठी उभ्या केलेल्या विविध ‘स्पेसेस’ या कलाकारांना नव्या प्रयोगांसाठी प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे प्रायोगिक नाटकाचे शंभर प्रयोग होण्याचा दुर्मिळ योगही पुण्यात नुकताच जुळून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT