पुणे

​सासवड एसटी आगारात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन

CD

सासवड, ता. ३ : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सासवड आगारात मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला ग्राहक मंच पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजी सुकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते.
वाहतूक नियंत्रक पोपट जैनक यांनी मराठी ही आपली मातृभाषा आहे. तिचा स्वाभिमान आणि अभिमान नेहमीच जपला पाहिजे. आपली भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी आणि ती उंचीवर नेण्यासाठी प्रत्येकाने आग्रही राहिले पाहिजे, असे सांगितले. तर वाहतूक नियंत्रक मनिषा भोईटे यांनी कुसुमाग्रजांची प्रसिद्ध कणा ही कविता सादर केली.
या प्रसंगी वाहतूक निरीक्षक सुनील येळे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक दत्तात्रेय मदने, वाहतूक नियंत्रक कैलास जगताप, कामगार संघटनेचे गणेश भुजबळ तसेच लक्ष्मी गायकवाड, रूपाली गिरमे, प्रवीण गायकवाड, रामचंद्र गावडे, प्रतीक्षा यादव, अमित वाल्मिकी आणि ज्योत्स्ना कवळे यांसह अनेक कर्मचारी व प्रवासी बांधव उपस्थित होते. सुनील येळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Earthquake : इराणवर आता नैसर्गिक संकट ! अमेरिका अन् इस्त्रायलचे बॉम्बहल्ले सुरु असतानाच भूकंपाने देश हादरला

इराणमध्ये शाळा बनली कब्रस्तान! JCBने १६० मुलींच्या मृतदेहाचे दफन; अमेरिका म्हणते, जाणीवपूर्वक हल्ला केला नाही

Sanju Samson: संजू सॅमसनवर एका सामन्याची बंदी, IND vs ENG उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार, ICC ची कारवाई? जाणून घ्या नेमकं सत्य

Nagpur News : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना फटका! बेसा येथील उपलांचीवार कुटुंबासह अनेक नागरिक अबुधाबीत अडकले; विमानसेवा रद्द झाल्याने परतीचा प्रवास थांबला

Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सुरक्षारक्षकांचा माज कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT