पुणे

हस्ती वर्ल्ड स्कूल

CD
धुळे : मुख्य अंकातील पानासाठी... -- हस्ती वर्ल्ड स्कूलमध्ये मराठी अभिजात भाषा दिन -- मातृभाषेच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ८ : दोंडाईचास्थित हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती वर्ल्ड स्कूल येथे हस्ती ग्रुप ऑफ स्कूलचे अध्यक्ष कैलास जैन यांच्या मार्गदर्शनात ‘मराठी अभिजात भाषा दिन’ विविध सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी भाषा समितीचे विद्यार्थी सदस्य चेतना पाटील, दिया पाटील व सोहम पाटील यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य जीवन सपकाळे व समन्वयिका समिना बोहरी उपस्थित होते. - मराठी अभिजात भाषा दिनानिमित्त शाळेत विविध वर्गांमध्ये काव्यवाचन व कथावाचन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेच्या निकालात पाचवीच्या गटातून जुहिका बोरसे हिने प्रथम, हितिका जैन हिने द्वितीय, तर याशिका अग्रवाल हिने तृतीय क्रमांक पटकावला. आठवीच्या गटात संस्कृती नागरे, स्वरा धनगर आणि दुर्वा गुजराथी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात युगांतरी गोसावी हिने जिल्हास्तरीय बालसाहित्य संमेलनात सादर केलेली कविता यावेळी प्रभावीपणे गाऊन दाखवली. योगेश बागले, गोरख वाघ व वैशाली महाजन यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Rain Alert : मोठी बातमी! माॅन्सूनच्या एक्झिट दरम्यान 22 राज्यांत मुसळधार पावसासह वादळाचा अलर्ट; 70 किमी स्पीडने वाहणार वारे, महाराष्ट्रात कशी स्थिती?

Pocso News : फेसबुकवरील मैत्री पडली महागात ! हॉटेलमध्ये बोलावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Palghar Earthquake : पालघरला भूकंप,३.७ रिश्टर स्केलचा धक्का; तलासरी तालुक्यातील कुर्झे केंद्रबिंदू, सात किलोमीटर खोलीवर भूकंपाची नोंद

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

नानांच्या अखेरच्या प्रवासात पत्नी-मुलाची अवस्था पाहून डोळे पाणावतील; नीलकांती आणि मल्हार यांचा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT