पुणे

भूगावला ग्रंथदिंडी, काव्यवाचन, पुस्तके भेट

CD

पिरंगुट, ता. २७ : भूगाव (ता. मुळशी) येथील प्राथमिक शाळा व ग्रामस्थांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या सुरांच्या जयघोषात ग्रंथदिंडी, काव्यवाचन, पुस्तके भेट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोकगीते, नाटिका, हस्तलिखिताचे प्रकाशन तसेच व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मराठी भाषेचा वारसा जपण्याचा संकल्प करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक भास्कर गायकवाड यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज आणि सरस्वती देवीच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत शाळेच्या परिसरातून ग्रंथ दिंडी काढली. यावेळी ‘मराठी भाषा आमची मायबोली’ आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व, कुसुमाग्रजांचे जीवनकार्य आणि मराठी भाषेचा इतिहास यावर आपले मनोगत व्यक्त केले. लहानग्यांच्या ओघवत्या शैलीतील या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज, शांता शेळके आणि बहिणाबाई चौधरी यांच्या प्रसिद्ध कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारी लोकगीते आणि नाटिका सादर केल्या.
यावेळी माधुरी शितोळे यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कवितांचे हस्तलिखिताचे प्रकाशन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दीपक करंजावणे व हनुमंत चोंधे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बियाँड मी या संस्थेमार्फत शालेय विद्यार्थ्यांना स्वची जाणीव, मासिक पाळी व शरीरात होणारे बदल आदींविषयी मार्गदर्शन करण्यात आले. हनुमंत चोंधे यांच्या तर्फे अनिल पवार लिखित ‘रामनदी आणि भवताल’ या पुस्तकाचा संच शाळेला भेट देण्यात आला. यावेळी सूर्यकांत घोरपडे, चंद्रकांत सोनार, संतोष गावडे, श्रुती काजरेकर, सुनीता वाकचौरे, सुषमा गायकवाड, ज्योत्स्ना मानकर, माधुरी शितोळे, अनुपमा काळे व शीतल जावळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur Danoli killing case : दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक

Pune Airport: पुणे विमानतळ धावपट्टीचे काम पावसाळ्यानंतरच; उन्हाळी हंगामामुळे दुरुस्ती लांबणीवर, ‘नोटम’ कालावधीत काम होणार!

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

SCROLL FOR NEXT