ओतूर, ता. ४ : ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे विलास तांबे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय डुंबरवाडी येथे रविवारी (ता. १) मराठी भाषा दिन व विज्ञान दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये काव्यवाचन स्पर्धा, ग्रंथ दिंडी, विज्ञान प्रदर्शन तसेच आरोग्य रॅली यांचा समावेश होता.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विलास तांबे इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रा. पल्लवी डुंबरे तसेच शिवनेरी विद्यालय धोलवड येथील सागर शिवशरण उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना मराठी भाषेचे संवर्धन व विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थिनींच्या उपक्रमांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. संजय देवकर म्हणाले की, मराठी भाषा दिन आणि विज्ञान दिन यांचे शैक्षणिक जीवनातील महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थिनींनी ज्ञान, संशोधनवृत्ती आणि सामाजिक जाणीव जोपासावी.
काव्यवाचन स्पर्धेत विद्यार्थिनींनी प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली. ग्रंथ दिंडीद्वारे वाचन संस्कृतीचा संदेश देण्यात आला. विज्ञान प्रदर्शनात विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, तर आरोग्य रॅलीद्वारे समाजात आरोग्याविषयी जनजागृती केली. बी. एड प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे, सचिव वैभव तांबे व खजिनदार मयूर ढमाले यांनीही शुभेच्छा दिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. संजय देवकर, प्रा. रामदास कदम, प्रा. उमा काळे, प्रा. निलम शिवणे, प्रा. सारिका शेटे, प्रा. शैला काशिद, प्रा. माया महाले, डॉ. स्नेहल वायकोस, प्रा. प्रतिभा तांबे, ग्रंथपाल ज्योती बेनके, नीलेश बटवाल, संदीप अहिनवे तसेच बी. एड विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.