वाईत ग्रंथ प्रदर्शनास प्रतिसाद
वाई, ता. ४ ः जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात मराठी विभाग, ग्रंथालय विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुक्तद्वार ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. फगरे, विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी मराठी भाषा गौरव दिनाची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहयोगी प्राध्यापक डॉ. संग्राम थोरात, डॉ. अमोल कवडे, सुमती कांबळे, राहुल तायडे, जितेंद्र चव्हाण, सहाय्यक ग्रंथपाल धनाजी जाधव, विनोद कांबळे, पवन शिवथरे, महादेव वासोळकर, धर्मेंद्र कायुंगडे, चेतन भोसले, श्रीधर पवार आदींनी परिश्रम घेतले. ग्रंथपाल व गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कांबळे यांनी कवितेच्या माध्यमातून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. विनोद वीर, डॉ. ज्ञानदेव झांबरे, बाळासाहेब टेमकर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
-----
07643
वाई : मुक्त ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी करताना डॉ. गुरुनाथ फगरे. त्या वेळी सोबत डॉ. चंद्रकांत कांबळे, डॉ. शिवाजी कांबळे, डॉ. संग्राम थोरात व इतर.