पुणे

मतमतांतरे, बुधवारसाठी

CD

अतिरेकी अस्मिता नको
परप्रांतियांनी मराठी भाषा रोजच्या व्यवहारासाठी आत्मसात करावी, पण ती स्वेच्छेने. सक्ती नको. मराठीत बोलले पाहिजे ही अपेक्षा वावगी नाही; मात्र त्यासाठी स्थानिक मराठी नागरिकांकडून घेतली जाणारी भूमिका अतिरेकी असता काम नये. आपण सर्वजण भारताचे नागरिक आहोत, हे विसरून चालणार नाही. अन्यथा एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात प्रवेश करण्यासाठीसुद्धा पासपोर्ट वा परवानासारखी बंधने आवश्यक ठरतील. आणि भविष्यात त्यासाठी तेथील प्रादेशिक भाषेची अट पूर्ण करावी लागेल. हे व्यवहार्य आहे का? मराठीविषयीची अतिरेकी भूमिका टाळायलाच हवी.
- डॉ. क. कृ. क्षीरसागर

आपण आधी मराठी बोलू
महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर काही घोषणा झाल्या आहेत. त्यातलीच एक म्हणजे रिक्षा, टॅक्सीचालकांना मराठीची सक्ती. घोषणा छान आहे; पण आपणच जर चालकांशी मराठीत बोलत नसू तर काय? मराठी शिकण्याचे मोफत वर्ग सुरू केले तरी आशा परिस्थितीत काय उपयोग होणार आहे? मराठीचा मान ठेवण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही. प्रत्येकाने ठरविले की, आजपासून मराठी व तीही शुद्ध बोलणार तरी मराठीचा गौरव होईल.
- आर. श्रीनिवासन

वीज ग्राहकांनो जागे व्हा!
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण छतावर सोलर बसवले. ग्रीडमध्ये जाणाऱ्या जास्तीच्या विजेचे पैसे एप्रिलच्या बिलातून वजा करून मिळणे अपेक्षित असते. पण माझ्याबाबतीत फेब्रुवारी २०२६ मध्येच कुठल्याही कारणाशिवाय माझ्या बिलात सुरुवातीचे ३२६८ युनिट कोणतीही पूर्वसूचना न देता ९०६ वर आणले. २३६२ युनिट म्हणजे कमीतकमी ६,७०० रुपयांचे क्रेडिट थेट गायब. फेब्रुवारीतच कपात करणे पूर्णपणे नियमबाह्य आहे. स्थानिक कार्यालयही यावर उत्तर देत नाही. सर्व सोलर ग्राहकांनी फेब्रुवारीचे बिल ताबडतोब तपासावे. युनिट कमी केले असतील तर ‘एमएसईडीसीएल पोर्टल’, ‘सीजीआरएफ’ आणि ‘एमईआरसी’कडे लेखी तक्रार करावी. एकजूट हाच यावर उपाय.
- नितीन निकुंभ, तळेगाव दाभाडे

मूळ मुद्यांकडे दुर्लक्ष
युरियाची गोणी ४५ किलोवरून तीस किलो करण्याचा सरकारचा विचार आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. पहिली गोणी ५० किलोची होती. सरकारने ४५ किलोची केली, त्यामुळे हा प्रश्न सुटला का? तर सुटणार नाही. अजूनही ३० किलोची गोणी केली तरीही हा प्रश्न सुटणार नाही. सरकारला हा प्रश्न सोडवायचा नाही. शेतकऱ्याच्या मूळ मुद्यांकडे दुर्लक्ष करायचे व इतर मुद्यांकडे लक्ष द्यायचे हा कुठल्याही पक्षाचे सरकार आले तरी त्यांचा एकमेव कार्यक्रम असतो. खतांची, बियाण्यांची होणारी टंचाई हा दरवर्षीचा गंभीर प्रश्न आहे. याचबरोबर बियाणांची खतांची भेसळ या मुद्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. सरकारने खताचा व बियाण्यांचा व्यवस्थित पुरवठा शेतकऱ्यांना खूपच प्रमाणात होईल याकडे लक्ष द्यावे. युरियाच्या गोणीचे वजन कमी करून काहीही फायदा होणार नाही.
- ॲड. श्रीकांत करे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT