पुणे

मराठी ज्ञानभाषा होण्याची गरज ः डॉ. पठारे प्रा. डॉ. हरी नरके यांच्या स्मृतीदिनानिमित्त व्याख्यान

CD

पुणे, ता. ९ ः ‘‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा केवळ उत्सव साजरा करून उपयोग नाही. मराठीचे जतन-संवर्धन करण्यासाठी तिचा ज्ञानभाषा म्हणून विकास होणे आवश्यक आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि उच्चशिक्षणाचे ज्ञान मराठीत उपलब्ध झाले, तरच भाषेचे भवितव्य सुरक्षित असेल,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले.
प्रा. डॉ. हरी नरके स्मृती प्रतिष्ठानतर्फे डॉ. नरके यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात पठारे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, हरी नरके यांच्या पत्नी संगीता नरके, प्रतिष्ठानचे सचिव मृणाल ढोले-पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी डॉ. नरके लिखित ‘पुस्तकप्रेमी असूनही बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली?’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
पठारे म्हणाले, ‘‘केवळ अभिजात दर्जाचे प्रमाणपत्र मिळाल्याने भाषेचे भवितव्य सुरक्षित होत नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत असताना मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत. ही केवळ भाषेची नव्हे, तर ज्ञानाच्या निर्मितीची आणि आत्मसात करण्याची समस्या आहे. मराठीत क्वांटम मेकॅनिक्ससारख्या विषयाचे उत्तम पुस्तक उपलब्ध झाले, तर मातृभाषेतून विषय समजून घेणे अधिक सुलभ होते. संशोधक आणि अभ्यासक पोपटपंचीने तयार होत नाहीत; ज्ञानाचे आंतरिकीकरण झाल्यावरच तयार होतात.’’
नरके यांच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, ‘‘नरके यांच्याएवढा सरळ, सज्जन आणि निःस्पृह माणूस दुर्मिळ आहे. अभिजात भाषेच्या निकषांवर काम करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या कामात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास करून मराठीच्या अभिजाततेविषयी जनजागृती केली. हजारो व्याख्याने देऊन त्यांनी हा विषय लोकांपर्यंत पोहोचविला.’’
----
संमेलनाच्या उत्सवात ‘साहित्य’ कोठे?
हल्ली आपण अतिशय उत्सवप्रेमी झालो आहोत. साहित्य संमेलनातही साहित्याचा ‘उत्सव’ करतो; मात्र त्या उत्सवात ‘साहित्य’ कुठे आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. भव्य मंडप, आतषबाजी, टीव्हीचे कॅमेरे आणि मोठमोठ्या घोषणा यात आपण रमलेलो असतो. घोषणा करून नेते निघून गेले की कॅमेरावालेही निघून जातात अन् संमेलनाच्या अध्यक्षाकडे आपण ढुंकूनही पाहत नाही, अशी टीका रंगनाथ पठारे यांनी केली.
फोटो ः 41233, 41234

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT