Shantabai Kamble Passed Away  sakal
पुणे

Shantabai Kamble Passed Away : लेखिका शांताबाई कांबळे यांचे पुण्यात निधन

मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्राच्या लेखिका शांताबाई कृष्णाजी कांबळे (वय १०० वर्षे) यांचे येथे बुधवारी सकाळी निधन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्राच्या लेखिका शांताबाई कृष्णाजी कांबळे (वय १०० वर्षे) यांचे येथे बुधवारी सकाळी निधन झाले आहे. त्यांच्यामागे मुलगा चंद्रकात आणि मुलगी गौरी तिरमारे आहेत. दलित पँथरचे दिवंगत नेते प्रा. अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत.

शांताबाई गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात मुलीच्या घरी होत्या. झोपेतच त्यांचे निधन झाल्याचे सकाळी ७ च्या सुमारास कुटुंबियांच्या लक्षात आले. गेल्यावर्षी १ मार्च रोजी त्यांच्या शंभरीचा कार्यक्रम शहरात झाला होता. त्याला रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्यासह दलित चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शांताबाई यांचा जन्म १ मार्च १९२३ रोजी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे झाला. शिक्षिका म्हणून सोलापूर जिल्हा स्कूल बोर्डात त्यांची १६ जानेवारी १९४२ रोजी नियुक्ती झाली. त्या जिल्ह्यातील पहिल्या दलित शिक्षिका ठरल्या. १९८१ मध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या. ‘माज्या जल्माची चित्तरकथा’ हे त्याचे १७ जून १९८६ रोजी प्रकाशित झालेले आत्मवृत्त विशेष गाजले.

'नाजुका' ह्या नावाने मुंबई दूरदर्शनवर चित्रमालिकेच्या स्वरूपात १० ऑगस्ट १९९० पासून हे आत्मकथन सादर झाले. फ्रेंच,इंग्रजी,हिंदी भाषेत पुस्तकरूपाने अनुवाद प्रसिद्ध झाले .'फेमिना' मासिकातून त्याचा इंग्रजीत अनुवादित झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे , तीरमारे गुरुजी यांचा सहवास त्यांना लाभला. शांताबाईंच्या पार्थिवावर नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे अंत्यसंस्कार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS March : मोठी बातमी! मीरा-भायंदरमधील मोर्चाआधीच मनसेचे अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात, भल्या पहाटे कारवाई

आनंदाची बातमी! 'अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन': मंत्री आदिती तटकरेंची विधान परिषदेत घाेषणा

Healthy Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा कुरकुरीत रवा-पोहे डोसा, पाहा सोपी आणि चटपटीत रेसिपी

Everything About Hormones: हार्मोन बिघाड म्हणजे काय? कारणं, लक्षणं आणि उपचार यांची संपूर्ण माहिती

Satara Crime: संतापजनक घटना! 'शिवथरमध्ये विवाहितेचा गळा चिरून निर्घृण खून'; घरात काेणीच नसल्याची संधी साधली अन्..

SCROLL FOR NEXT