पुणे

लांडगे नाट्यगृहात सीसीटीव्ही बसविणार

संजय बेंडे

भोसरी- अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सीसीटीव्ही लवकरच लावण्यात येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेत वाढ होणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने तीस लाखांची तरतूद केली. निविदा लवकरच प्रसिद्ध होणार आहे. आता मेटल डिटेक्‍टरही बसविण्याची मागणी होत आहे.

परिसरातील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी साडेनऊशे आसन क्षमता असलेले अत्याधुनिक नाट्यगृह बांधले. स्वतंत्र कलादालनही आहे. नाट्यगृहाचे उद्‌घाटन जानेवारी २०११ मध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. तर एप्रिल २०११ मध्ये कार्यक्रमास सुरवात झाली. यामुळे नवीन कार्यक्रम बघण्याची संधी निर्माण झाली. मात्र सीसीटीव्ही बसविले नसल्याने सुरक्षा रामभरोसे आहे. शाळांची स्नेहसंमेलनेही भरविली जातात. लहान मुलांसह श्रोत्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्याची मागणी होत होती. यासाठी सीसीटीव्हीसाठी आमदार महेश लांडगे यांनीही पाठपुरावा केला. आता पालिकेकडून २९ लाख ९१ हजारांचा निधी मंजूर झाला आहे.

चौदा सीसीटीव्ही बसविणार
नाट्यगृहाच्या अंतर्गत भागात सहा तर बाह्यभागात आठ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. यासाठी ऑप्टिकल फायबर केबल (४८ कोअर) वापरण्यात येणार आहे. त्यामुणे गुणवत्ता अधिक असेल. तीन महिन्यांपर्यंत चित्रफिती साठवून ठेवण्याची क्षमताही असणार आहे.

मेटल डिटेक्‍टर केव्हा?
अंकुशराव लांडगे नाट्यगृहात मोठ्या नेत्यांच्या कार्यक्रमासाठी मेटल डिटेक्‍टर मागविले जातात. मात्र कार्यक्रमानंतर पुन्हा नेण्यात येतात. त्यामुळे सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न जैसे थेच आहे.

कॅंटीनची सोय करा
नाट्यगृहात कॅंटीन सोय करण्याची मागणी होत आहे. कार्यक्रमाचे संयोजक कॅंटीनची तात्पुरती सोय करतात. मात्र जागा असूनही ती भाडे तत्त्वावर दिली जात नाही. त्यामुळे पालिकेचे उत्पन्नही बुडत आहे.

लावणीवर बंदी ?
लावणीचा कार्यक्रम घेतल्याने श्रोते बेभान होऊन नाट्यगृहाची नासधूस करतील, या भीतीपोटी व्यावसायिक लावणीच्या कार्यक्रमावर अघोषित बंदीच आहे. फक्त भोसरी-कला क्रीडा महोत्सवाद्वारेच गणेशोत्सव ठिकाणी लावणीचा कार्यक्रम होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rate Cut: डिसेंबरमध्ये तुमचा EMI कमी होणार? आरबीआय गव्हर्नर मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Medical Academy : वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या ॲकॅडमीचा पैसे देण्यास टाळाटाळ, विद्यार्थी गेला ग्राहक न्यायालयात अन् १३ लाख रूपये देण्यास पाडलं भाग...

Latest Marathi News Live Update : मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये २५ तृतीयपंथियांनी विष घेतले

Karnataka Education : दहावी, बारावी उत्तीर्णतेसाठी आता 33 टक्के गुणांची मर्यादा; राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठा बदल, कधीपासून नियम लागू होणार?

Thar Accident : भरधाव थारची सख्ख्या बहिणींना धडक; एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT