flower-crop
flower-crop 
पुणे

टोकिता फुजिआमा फ्लॉवर पीकाबाबत शेतकऱ्यांची तक्रार

पराग जगताप

ओतूर (जुन्नर) : ओतूर येथील भिमाजी महादेव औटी यांच्या शेतात समिर डुंबरे यांनी टोकिता फुजिआमा या जातीच्या फ्लॉवरच्या रोपांची दि. 6 व 7 सप्टेंबरला दोन एकरात लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी श्रीनाथ हायटेक नर्सरी, डुंबरवाडी येथून टोकिता फुजिआमा जातीची 28 हजार, तर धवल 7 हजार रोपे आणून दोन एकरात लागवड केली. त्यासाठी खते, औषधे व मशागत करून हजारो रूपये खर्च केले. फ्लॉवरचे पीकही जोमात दिसत होते, मात्र फ्लॉवरच्या गड्ड्याला लालसरपणा आला आहे. व्यवस्थित पहाणी केल्यानंतर त्यांच्या असे निदर्शनास आले की टोकिता फुजिआमा जातीच्या सर्वच फ्लॉवरचे गड्डे लालसर निळे पडले आहेत, तर धवलचे जातीचे फ्लॉवरचे गड्डे पांढरे शुभ्र आहेत. लालसर निळे पडलेल्या फ्लॉवरच्या गड्ड्याला बाजारात कवडीची किंमत मिळत नाही. 

एकाच शेतात लावलेल्या फ्लॉवरच्या या दोन जातीच्या रोपांच्या उत्पादनात व गुणवत्तेत इतका फरक दिसत असल्याने टोकिता फुजिआमा जातीच्या बियाण्यात किंवा रोपांतच दोष असल्याची त्यांना खात्री पटली असून सदर गोष्ट त्यांनी श्रीनाथ हायटेक नर्सरी, डुंबरवाडी यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी संबंधित कंपनीचे अधिकारी बोलावून सदर प्रकार दाखवला असता त्या अधिकाऱ्याने उडवा उडवीची उत्तरे देत हा हवामानाचा दोष आहे असे कारण सांगितले. पण दुसऱ्या जातीचे फ्लॉवरचे गड्डे उत्कृष्ट असल्याने नक्की हा काय प्रकार आहे हा संशोधनाचा विषय आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी परिसरात चौकशी केली असता अजून एका शेतकऱ्याबाबात हाच प्रकार झाला असल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे या टोकिता फुजिआमा फ्लॉवरच्या रोपांच्या व बियाण्याच्या फसवणुकीबाबत ओतूर कृषी मंडळ अधिकारी व जुन्नर पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार या शेतकऱ्याने केली आहे. तर मयुर औटी व समिर डुंबरे या तरूण शेतकऱ्यांनी संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT