Hemalata-Pardeshi
Hemalata-Pardeshi 
पुणे

तर दौंड नगरपालिका बंद ठेवा : उपनगराध्यक्षा

सकाळवृत्तसेवा

दौंड : दौंड नगरपालिकेत 'झीरो पेंडंसी'च्या नावाखाली कार्यालयात चार ते पाच जणांचा अपवाद सोडता कोणीच थांबत नसल्याचा प्रकार सुरू आहे. खरोखर झीरो पेंडंसीला प्राथमिकता देत कामे सुरू असेल तर नगरपालिका त्या दरम्यान बंदच ठेवायला हवी, अशी उपरोधिक मागणी शिवसेनेच्या उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी यांनी केली आहे.
 उपनगराध्यक्षा तथा पाणीपुरवठा समितीच्या सभापती असलेल्या हेमलता परदेशी या नगरपालिकेच्या कारभाराविषयी सभागृहात स्पष्टपणे बोलतात तर रस्त्यांची कामे न केल्याने १५ नोव्हेंबर २०१७ला नगरपालिका कार्यालयास कुलूप लावण्याच्या आंदोलनात त्या सहभागी होत्या. त्याबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, 'प्रशासनाला एक महिन्याभरापूर्वी इशारा दिला होता तरी रस्त्यांची कामे सुरू न झाल्याने नाइलजाने आम्हाला कार्यालयास कुलूप लावावे लागले. सतत पाठपुरावा करून देखील कामे होत नसल्याने सभागृहात बोलावे लागत आहे. नगरपालिकेच्या प्रलंबित फाईल निकाली काढण्यासह अनावश्यक फायली झीरो पेंडंसी अंतर्गत नष्ट करण्याचे काम सुरू असले तरी त्याचा रोजच्या कामावर परिणाम झाला नाही पाहिजे. कार्यालयीन वेळेत दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक आपल्या समस्या, अडचणी व सूचना घेऊन येतात परंतु त्या वेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने निर्णय घेता येत नाही. कार्यालयाचे एक वेळापत्रक निश्चित करून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. नगरपालिकेत काही जणांना कामाची सवय न राहिल्याने ते टाळाटाळ करतात, मात्र माझा पाठपुरावा सुरूच राहील.'

नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात हे विकासकामांच्या मागण्या फक्त ऐकून घेत सदर काम करतो, असे सांगतात. परंतु प्रत्यक्षात करत नाहीत. ते हसून विषय टाळतात, अशी खंत हेमलता परदेशी यांनी व्यक्त केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT