milind_ekbote_40shikrapur
milind_ekbote_40shikrapur 
पुणे

मिलींद एकबोटे शिक्रापूर पोलिसांत हजर; कोरेगाव-भिमा हिंसाचार प्रकरणी चौकशी

भरत पचंगे

शिक्रापूर (पुणे) : कोरेगाव-भिमा (ता. शिरूर) हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे हे आज सकाळी अकराच्या सुमारास शिक्रापूर पोलिसांपुढे हजर झाले. पुणे जिल्हा ग्रामिणचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पखाले चौकशी करत आहेत. 

कोरेगार-भिमा हिंसाचार प्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल करताना चुकीचे आरोप लावले असल्याचा दावा करत एकबोटे न्यायालयात गेले आहेत. यासंबंधाने सरकार व एकबोटेंच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आली आहे. एकबोटे सापडत नसल्याचे महाराष्ट्र सरकारने म्हटले होते, तर एकबोटेंच्या वकिलांनी पोलिस बोलवत नसल्याचे सांगितले होते. या एकूण प्रकराबाबत न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेबाबात नाराजी व्यक्‍त केली होती. 

दरम्यान आज सकाळपासूनच शिक्रापूर पोलिस ठाणे परिसरात वाहनांची वर्दळ सुरू होती. काहीतरी वेगळे चालल्याची चर्चा शिक्रापूरात सुरू असतानाच एकबोटे काही कार्यकर्त्यांसोबत पोलिस स्टेशनला हजर झाले. ते सध्या चौकशीसाठी अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पखाले यांचेसमोर बसलेले असून साधारण तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. पखाले पत्रकारांशी संवाद साधणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT