Hindavi
Hindavi 
पुणे

वाल्हेकरवाडी ग्रामस्थ व धारकऱ्यांकडून तीन लाखांचा धनादेश

ज्ञानेश्वर भंडारे

वाल्हेकरवाडी : वाल्हेकरवाडीतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्या सर्व धारकऱ्यांच्या आग्रहाला मान देऊन आज सकाळी सात वाजता संभाजी भिडे गुरुजी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांच्या निवासस्थानी आले. त्यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे उपस्थित यांनी उपस्थिती लावली. 

तसेच संजय बापू जठर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पुणे जिल्हा प्रमुख अविनाश बापू मरकळे, संपर्कप्रमुख सचिन थोरात, चिंचवड विभाग आणि वाल्हेकरवाडीतील धारकरी संदीप वाल्हेकर, गजानन चिंचवडे, शेखर चिंचवडे, आनंदा वाल्हेकर, सुभाष वाल्हेकर, युवराज वाल्हेकर, सोमनाथ मुसुडगे, सोमनाथ हरपुडे, हेमंत गवंडे, राजकिरण ठाकूर, तुषार वाल्हेकर, धनंजय म्हस्के, प्रवीण रसाळ, बाळू शिवले, संतोष वाघ, गणेश भुजबळ, सुयोग वाल्हेकर, तन्मय वाल्हेकर, अभिषेक वाल्हेकर, रसिका वाल्हेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गुरुजी म्हणाले, की वाल्हेकरवाडी व चिंचवड परिसरातून वीस ते चाळीस वयोगटातील शेकडो तरुण घेऊन मोहिमेला जानेवारीत सहभागी व्हा व या सुवर्ण सिंहासन पुनसंस्थापन न्यासाला कर्तव्यपूर्ती म्हणून आपण पिंपरी चिंचवड परिसरातून तीस किलोपर्यंतच्या सुवर्ण संचयनासाठी धनाचे संकलन करा.

खासदार बारणे यांना म्हणाले, की तुम्ही या कार्यात स्वत: मोठी मदत यंत्रासारख्या ताकदीने करू शकाल. तसेच रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या सध्या चालू असलेल्या जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई या अभियानाचे कार्य समजावून घेऊन संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर व सोमनाथ मसूडगे यांच्या कार्याचा गौरव करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच सांगलीमधील जलपर्णी विषयावरील खंतही व्यक्त केली.

यावेळी गोसेवक खिलारप्रेमी संदीप पोपटराव वाल्हेकर यांच्या गोशाळेला भेट देऊन त्यांनी हा देशी गाई संगोपन उपक्रम घरोघरी व्हावा. अशाने धर्माचे व देशाचे कल्याण होईल, असे मार्गदर्शन केले. वाल्हेकर कुटुंबीयांकडून गुरुजींना विठ्ठल मूर्ती सप्रेम भेट देण्यात आली. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन संदीप पोपटराव वाल्हेकर व गणेश भुजबळ यांनी केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT