पुणे

रहाटणीतल्या अनधिकृत बांधकामांना कुणाचा आशीर्वाद?

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : काळेवाडी, रहाटणी परिसरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून, महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचा बांधकामांना आशीर्वाद असल्याचे नागरिकांकडूनच बोलले जात आहे. 

कुठे सुरू आहेत 
काळेवाडी : तापकीरनगर, विजयनगर, ज्योतिबानगर, नढेनगर, राजवाडेनगर, तापकीर चौक. रहाटणी : रामनगर, वैदवस्ती, लिंक रोड, नखातेनगर, श्रीनगर. 

काय होतंय 

  • मजल्यावर मजले चढविले जाताहेत. 
  • बांधकाम जुने वाटण्यासाठी रातोरात रंगरंगोटी. 
  • काही धार्मिक स्थळांचेही वाढीव बांधकाम. 

वस्तु:स्थिती 
संबंधित बीट निरीक्षक व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामे सुरू असल्याची चर्चा आहे. एखाद्या बांधकामाच्या पायासाठी खड्डा खोदताच किंवा वाढीव बांधकामासाठी साहित्य आणताच याची खबर बीट निरीक्षकांना असते. मात्र, संबंधितांकडून तोडपाणी करताच बांधकामाकडे डोळेझाक केली जाते. 

अशी बनवाबनवी 
तापकीर चौकात बीआरटी रस्त्यालगत रातोरात वाढीव बांधकाम करण्यात आले. त्यानंतर बांधकाम दिसणार नाही यासाठी समोरच्या बाजूला विविध होर्डिंग्ज लावले. काही दिवसांत प्लास्टर करून रंगकाम केले. सध्या हे बांधकाम जुने वाटत असून, अजूनही वरच्या मजल्यावर बांधकाम सुरू आहे. मात्र, हे बांधकाम प्राधिकरण की महापालिकेच्या हद्दीत या गोंधळामुळे दुर्लक्षित केले जात आहे. 

बकालपणात वाढ 
काळेवाडी, रहाटणी परिसराला अगोदरच अनधिकृत बांधकामांमुळे बकालपणा आला आहे. त्यात लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाच्या डोळेझाकीमुळे परिसराचे स्टॅंडर्ड झोपडपट्टीत रूपांतर होत आहे. आगीसारखा अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ सेवा मिळणे कठीण आहे. 

घरभाड्याची लालसा 
परिसरात भाडेतत्त्वावरील खोल्या व दुकानांची मागणी वाढल्याने अनेकांनी लालसेपोटी मजल्यावर मजले चढविण्यास सुरवात केली आहे. मात्र, अशा बांधकामांमुळे पाणीपुरवठा, रस्ते यांसह इतर सार्वजनिक सेवांवर ताण पडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : 'आम्ही इकडून तिकडे उड्या मारल्या नसत्या, तर तुम्ही मंत्री तरी झाला असता का?' शंभूराज देसाईंचा कोणावर निशाणा?

BMC: दोन्ही शिवसेना शेजारी? ठाकरेंच्या कार्यालयातील ३० टक्के जागा काँग्रेसला

T20 World Cup 2026 : भारत-पाक सामन्याच्या वादात आता श्रीलंकेची उडी; PCB ला पत्र लिहित करून दिली 'त्या' उपकाराची आठवण

Latest Marathi News Live Update : पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त होणारे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द

जब्राट सिनेमासाठी वनिता बनली रॅपर; सोशल मीडियावर नवीन लुक चर्चेत

SCROLL FOR NEXT