representational image of traffic jam at Chandani Chowk in Pune
representational image of traffic jam at Chandani Chowk in Pune 
पुणे

चांदणी चौक उड्डाण पुलाच्या कामासाठी तत्काळ जागा द्या : गिरीश बापट

सकाळवृत्तसेवा

पुणे : चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने  तात्काळ नॅशनल हायवे अॅथाॅरिटी ऑफ इंडियाकडे जागा मोकळी करुन द्यावी, अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, संसदीय कार्य मंत्री आणि पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्गा संदर्भात व्ही. व्ही. आय.पी. सर्किट हाऊस पुणे येथे पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी  उपस्थित संबंधितांना त्यांनी ही सूचना केली.

बापट म्हणाले, ''चांदणी चौक येथील प्रस्तावित उड्डाणपूल व कोथरुड येथील शिवसृष्टी या बी. डी. पी. जागेच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर लवकरच बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेने लवकरात लवकर राज्य शासनाकडे सादर करावा. चांदणी चौकामध्ये होणारे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. या उड्डाण पुलासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करुन दिल्यानंतर नॅशनल हायवे अॅथाॅरिटीने या पुलाचे काम तत्काळ हाती घेत पूर्ण करावे. महामार्गांच्या कामांचे प्रस्ताव सादर करतांना जिल्हाधिकारी आणि संबंधीत विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून सादर करावेत, जेणेकरुन अनावश्यक खर्च टाळता येईल. आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाचा विकास करताना देहू ते आळंदी या मार्गाचा विकास होणेही आवश्यक आहे. पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे करत असतांना स्वच्छतागृहांची कामेही प्राधान्याने करावीत. भक्तनिवासची कामे सर्व सोयी-सुविधांनी युक्त करावीत. आळंदी येथे वारकऱ्यांसाठी पार्किंग व्यवस्थेवर भर देण्यात यावा.''

यावेळी राष्ट्रीय महामार्गावर सुरु असणारी कामे तसेच पूर्ण व अपूर्ण कामांच्या सद्यस्थितीचा आढावा  बापट यांनी घेतला. ते म्हणाले, या वर्षीची रस्त्यांची कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावीत. याबाबत संबंधीत अधिकारी आणि विविध कंपन्यांशी चर्चा करुन सर्व कामे गतीने पूर्ण करा. या कामांच्या प्रगतीचा अहवाल पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत सादर करावा. यावेळी जिल्हयातील महामार्गांवरील उड्डाणपूल, भुयारी मार्ग, पालखी मार्गावरील  कामे, स्वच्छतागृहे तसेच नऱ्हे- वडगाव येथील नवले पूलानजीक होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीस विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, पुणे महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल तेली -उगले, एन.एच.ए.आय. चे प्रकल्प संचालक एस.डी. चिटणीस तसेच संबंधीत विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT