पुणे

पुणे आयकर अधिकाऱ्यांच्या मोटारीला अपघात; निरीक्षक ठार, दोन जखमी 

संदीप भेगडे

देहूरोड : तळेगाव दाभाडे येथे कारवाई करून पुण्याला परतणाऱ्या स्वारगेट पुणे येथील आयकर सधन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मोटारीस पुणे मुंबई महामार्गावर देहूरोड नजीक झालेल्या अपघातात विभागाचा एक निरीक्षक ठार झाला तर उपसंचालकासह दोघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज (गुरुवार) सकाळी सहाच्या सुमारास झाला.

देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक त्यागी (वय २८ वर्ष, रा. हडपसर पुणे) असे अपघातात ठार झालेल्या दुर्देवी अधिकाऱ्याचे नाव आहे. ते आयकर सधन पुणे विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत होते.याच विभागाचे उपसंचालक आनंद उपाध्याय (वय ४० वर्ष) आणि त्यांचे सहकारी अधिकारी कृष्णकुमार मिश्रा (वय ४० वर्ष) हे जखमी झाले असून त्यांच्यावर प्रथम सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. नंतर त्यांना हिंजवडी येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी : दोन मोटारीतून आलेल्या आयकर सधन पुणे विभागाच्या १२ अधिकाऱ्यांच्या पथकाने तळेगाव दाभाडे येथील आरएमसी उद्योगावर बुधवारी (ता २२) छापा घातला. सदर कारवाई रात्रभर सुरू होती. ही कारवाई आटोपून पथक गुरुवारी सकाळी माघारी निघाले होते. त्यापैकी एका मोटारीने मार्गातील अमरदेवी मंदिर पास केले होते. मागील मोटारीने तळेगाव सोडत सोमाटणे टोल नाका पास केल्यावर पुढे अमरदेवी मंदिरानजीक लोखंडी अँगल घेऊन पुणे बाजूला निघालेल्या कंटेनरला पाठीमागून धडक दिली. धडक अतिशय जोरात बसल्याने मोटारीची डावी बाजू अर्ध्याहून अधिक चिरली गेली. त्यात त्यागी हे ठार झाले तर उपाध्याय आणि मिश्रा हे जखमी झाले.

अपघातानंतर सोमाटने बाजूला काही अंतरापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. सकाळच्या प्रस्तुत प्रतिनिधिने देहूरोड पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलीस निरीक्षक अरुण मोरे व पथकाने घटनास्थळी धाव घेत.

मात्र तत्पूर्वीच आयकरच्या उपस्थित अन्य अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात पोहोचविले होते. मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यागी यांचा मृत्यू झाला. देहूरोड आणि ताळेगाव वाहतूक पोलिसांनी वाहतुक नियंत्रित केल्यावर तासाभराने मार्ग मोकळा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar Death: सिनेसृसृष्टीला मोठा धक्का! अभिनेते नाना पाटेकर यांचं अकस्मात निधन; चाहत्यांना कानावर विश्वास बसेना

Nana Patekar Passes Away: मित्रांच्या घरी भाकरी मागितली, वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतरही नाटक केलं; नानांचा संघर्ष थक्क करेल

Eknath Shinde: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सरकारी तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क

Tukaram Mundhe: महाराष्ट्रातील अन्नसुरक्षा मोहिमेचा जगभर गवगवा; तुकाराम मुंढेंची न्यूयॉर्क टाइम्सने घेतली दखल

पुणे ग्रँड टूरची UCI 2.1 श्रेणीत झेप; 26 जानेवारीपासून रंगणार ६ टप्प्यांची स्पर्धा

SCROLL FOR NEXT