पुणे

'आयटीआय'ला झळाळी; राज्य सरकारकडून शंभर कोटींची तरतूद

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांना आवश्‍यक मनुष्यबळ तयार करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) आता अद्ययावत व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. ओल्ड एज केअर, फॅशन डिझायनिंग, इलेक्‍ट्रोनट्‌स मेकॅनिकल याबरोबरच पारंपरिक पद्धतीपेक्षा कॉम्प्युटराइज्ड पद्धतीने कामाला प्राधान्य मिळावे, यादृष्टीने अत्याधुनिक पद्धतीची यंत्रसामग्री 'आयटीआय'ला मिळणार आहे. त्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूदही राज्य सरकारने केली आहे. 

मागील 10 वर्षांमध्ये तंत्रज्ञानात झपाट्याने झालेल्या बदलांचा परिणाम औद्योगिक कंपन्यांवरही झाला आहे. त्यासाठी अधिक तंत्रकुशल मनुष्यबळाची कंपन्यांना गरज भासू लागली आहे. मात्र, राज्यातील सर्व 'आयटीआय'मध्ये वर्षानुवर्षे परंपरागत चालणारे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविण्यालाच प्राधान्य दिले जाते. काही अपवाद वगळता दरवर्षी 35 ते 36 व्यावसायिक अभ्यासक्रम (ट्रेड) विद्यार्थ्यांना शिकविले जातात. 'आयटीआय'मध्ये 50 वर्षांपेक्षा जास्त जुने यंत्रे आहेत. त्यावरच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. प्रत्यक्षात कंपन्यांमध्ये आधुनिक पद्धतीची यंत्रसामग्री उपलब्ध असते. परिणामी, 'आयटीआय'च्या विद्यार्थ्यांना कामावर घेतल्यानंतर कंपन्यांपुढे त्यांना पुन्हा एकदा एक-एक वर्षाचे प्रशिक्षण देण्याशिवाय पर्याय राहात नाही. 

यासंदर्भात औंध 'आयटीआय'सह जिल्ह्यातील काही 'आयटीआय'ची सद्य:स्थिती, त्यांच्याकडील अभ्यासक्रमांची पाहणी आमदार विजय काळे यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी राज्यातील अन्य 'आयटीआय'चाही आढावा घेतला होता. यासंदर्भात काळे म्हणाले, ''सध्या पुणे व परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या वाढत आहेत. आधुनिक बदलांनुसार त्यांच्याकडे यंत्रसामग्री आहे. याउलट आपल्या 'आयटीआय'मध्ये वर्षानुवर्षे जुनी यंत्रसामग्री आहे, अभ्यासक्रमही जुने आहेत. त्यामध्ये सुधारणा केली नाही, तर कुशल मनुष्यबळ तयार होणार नाही. जुन्या यंत्रसामग्रीचा मुलांच्या मनावर परिणाम होतो. म्हणूनच सुधारित अभ्यासक्रम आणि अद्ययावत यंत्रसामग्री घेण्यावर आम्ही भर दिला आहे.'' 

औंधमधील मुलींच्या 'आयटीआय'चे प्राचार्य व्ही. पी. जगताप म्हणाले, ''कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी अभ्यासक्रम अद्ययावत होणे आवश्‍यक असते. त्याचबरोबरच यंत्रसामग्रीचीही गरज असते. मुलींसाठी नवीन अभ्यासक्रम सुरू झाले असून फळांवरील प्रक्रियेपासून ते मेडिकल इलेक्‍ट्रॉनिकपर्यंतचा समावेश आहे.'' 

सध्या अद्ययावत तंत्रज्ञानचा काळ आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत. म्हणूनच कंपन्यांना कुशल व अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त मनुष्यबळासाठी आवश्‍यक नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. ऑगस्ट 2016 आणि ऑगस्ट 2017 या दोन्ही वर्षी नवीन 'आयटीआय'साठी अद्ययावत अभ्यासक्रम दिले आहेत. त्याचा विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यासाठी चांगला उपयोग होतो. 95 टक्के तरुणांना काम मिळू लागले आहे. 
- प्रकाश सायगावकर, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलांचे) औंध 

'आयटीआय'साठीचे सुधारित अभ्यासक्रम 

  • नवीन डिझेल इंजिन 
  • सीआरडीआय व्हेईकल 
  • सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशिन 
  • कॉर्डिनेट मेनरिंग मशिन 
  • डस्ट ऍण्ड स्प्रे प्रूफ पॉलिशिंग मशिन 
  • इलेक्‍ट्रॉनिक मेकॅनिकल 
  • सीओपीई 
  • शीट मेटल वर्कर 
  • ऑटो इलेक्‍ट्रिकल ऍण्ड इलेक्‍ट्रॉनिक्‍स

मुलींसाठीचे अभ्यासक्रम... 

  • ओल्ड एज केअर 
  • कन्झुमर इलेक्‍ट्रॉनिक 
  • मेडिकल इलेक्‍ट्रॉनिक 
  • आर्किटेक्‍चरल ड्राफ्ट्‌समन 
  • बेकरी ऍण्ड कन्फेक्‍शनरीज 
  • फॅशन डिझायनिंग 

'आयटीआय'ची संख्या
राज्य : 441 
पुणे जिल्हा : 16 
पुणे : दोन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT