पुणे

होलेवाडी येथील रेहाऊ पॉलिमर कंपनीचे कामगार संपावर

सदाशिव आमराळे

पुणे दावडी : होलेवाडी (ता.खेड) येथील रेहाऊ पॉलिमर प्रा. लिमिटेड कंपनीचे कामगार व्यवस्थापनाने खोटी कारणे देऊन नऊ कामगारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ वीस नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

निलंबित केलेले आठ कामगार व बडतर्फ केलेला एक कामगार यांना व्यवस्थापनाने तात्काळ कामावर घ्यावे अशी मागणी कामगारांनी केली आहे. होलेवाडी येथे असलेल्या रेहाऊ पॉलिमर कंपनीत कायम स्वरूपी सुमारे ६६ कामगार आहेत. हे कामगार पूना एम्प्लॉईज युनियनचे सदस्य आहेत. चार महिन्यांवर या कंपनीच्या कामगारांचा वेतन करार आला आहे. मात्र त्याआधीच व्यवस्थापनाने कामगारांवर दहशतीचे वातावरण निर्माण करायला सुरूवात केली आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. कामगारांना खोटी कारणे देऊन किंवा १५ मिनीटे उशीरा आले, तसेच युनियनचे सभासद झाले यासारख्या क्षुल्लक कारणांवरून कंपनीने निलंबीत केले, असा संघटनेचा दावा आहे.

व्यवस्थापनाने आठ जणांना निलंबित केले असून एक जणास सेवेतून बडतर्फ केले आहे. त्यामुळे व्यवस्थापनाच्या निषेधार्थ रेहाऊ पॉलिमरचे कामगारांनी २९ ऑक्टोबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. २१ दिवसांची पूर्वसूचना देऊन २० नोव्हेंबरपासून काम बंद ठेवून बेमुदत संपावर गेले आहेत. कंपनी गेटच्या रस्त्याच्या विरूध्द बाजूस कामगार एकत्र बसून शांततेच्या मार्गाने कामगारांचे आंदोलन सुरू आहे.

निलंबित केलेल्या व बडतर्फ कामगारांस कंपनीने तात्काळ परत घ्यावे म्हणजे कामगार संप लगेच मागे घेतील, असे विनोद हाडवळे व स्वप्नील बारमुख या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. व्यवस्थापनाची कामगारांच्या संपाबाबतची भूमिका जाणण्याचा प्रयत्न केला असता कोणीही अधिकारी येथे उपस्थित नसल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT