File photo of Laxman Dhobale
File photo of Laxman Dhobale 
पुणे

अनुसूचित जातींच्या आरक्षणात प्रवर्ग निर्माण करा : ढोबळे 

सकाळवृत्तसेवा

पुणे : अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणात अ, ब, क आणि ड असे प्रवर्ग निर्माण करा, अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 20 डिसेंबर रोजी नागपूर येथे विधान भवनावर मोर्चा आयोजित केला आहे, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

स्वातंत्र्यानंतर दलित समाजाचे जीवनमान उंचविण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था निर्माण केली गेली. याचा 1965 मध्ये बी. एन. लोकूर समितीने आढावा घेतला. यानंतर आरक्षणाला मुदतवाढ मिळत गेली, असे ढोबळे यांनी सांगितले. ''अनुसूचित जातींमध्ये 59 जातींचा समावेश आहे. जागरूक आणि संघटित समाजाने आरक्षणातील सवलतींचा फायदा घेतला. मात्र, या सवलतींपासून समाज उपेक्षित राहिला आहे. उत्तर प्रदेशात चर्मकार, बिहारमध्ये पासवान, महाराष्ट्रात बौद्ध समाजाला आरक्षणाचा फायदा झाला. महाराष्ट्रात 57 जाती आरक्षणापासून वंचित राहिल्या आहेत. या जातींना नोकरी आणि राजकारणातील आरक्षणाची सवलत मिळाली नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल राहिलेल्या आणि आरक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकाच्या प्रगतीसाठी सक्षम झालेल्यांनी आरक्षणाचा फायदा उपलब्ध करून दिला पाहिजे,'' असेही ढोबळे म्हणाले. 

''पंजाब, हरियाना, तमिळनाडू, आंध्र प्रदेश सरकारने आरक्षणाची जातीनिहाय वर्गवारी करून दुबळ्यांना आरक्षणाची सवलत मिळवून देण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारने याचप्रमाणे काम करावे. तसा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे शिफारस करावी, अशी आमची मागणी आहे. अ, ब, क, व ड असा प्रवर्ग करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत संसदेने घटना दुरुस्ती करून त्याची अंमलबजावणी करावी, असा निकाल न्यायालयाने दिला आहे,'' अशी माहिती ढोबळे यांनी दिली. या पत्रकार परिषदेस दादासाहेब सोनवणे, तात्या थोरात, अनिल हातागळे, बाळासाहेब राखपसरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT