पुणे

विकासासाठी सुविधांवर भर - आमदार जगताप

सकाळवृत्तसेवा

पिंपरी  - ‘‘रस्ते, वाहतूक व्यवस्था या शहराच्या रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे ही व्यवस्था सक्षम ठेवणे गरजेचे आहे. शहराच्या परिपूर्ण विकासासाठी आवश्‍यक सुविधा देण्यावर आमचा भर आहे,’’ असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले. 

महापालिकेतर्फे बिजलीनगर येथे उभारण्यात येणारा भुयारी मार्ग (अंडरपास), केशवनगर-काळेवाडी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा दुसरा टप्पा, चिंचवड-काळेवाडी पुलापासून भाटनगर मलनिस्सारण प्रकल्पापर्यंत प्रस्तावित १८ मीटर विकास आराखड्यातील रस्ता आदी प्रमुख कामांचे भूमिपूजन जगताप यांच्या हस्ते झाले. तर, चिंचवडगाव येथील लॉन टेनिस क्रीडांगणाचे लोकार्पण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर नितीन काळजे, स्थायी समितीच्या मावळत्या अध्यक्षा सीमा सावळे, ‘ब’ प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसेवक नामदेव ढाके, राजेंद्र गावडे, बाळासाहेब ओव्हाळ, सुरेश भोईर आदी उपस्थित होते. 

काळजे म्हणाले, ‘‘शहरातील विविध भागांतील विकासकामांतून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील. चिंचवडगाव येथे प्रस्तावित असलेल्या रस्त्यामुळे नागरिकांचा मार्ग सुखकर होईल.’’ ढाके म्हणाले, ‘‘बिजलीनगर येथील चौकात छोटे-मोठे अपघात होत होते. अनेक वर्षांपासून येथे भुयारी मार्ग करण्याची मागणी होती. ती पूर्ण होणार आहे.’’ नगरसेवक गावडे यांनी चिंचवडगाव येथील विविध कामांची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday November 2026: नोव्हेंबरमध्ये बँकांना तब्बल 17 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद? पाहा संपूर्ण यादी

YUVRAJ SINGH: अभिषेक इशान वैभवला ऋतुराजला वनडे संघात स्थान द्या! युवराज सिंगने निवडकर्त्यांना सुनावलं; नेमकं काय म्हणाला?

Viral Video: मुंबईत महिला कार चालकाचा धुमाकूळ; पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात पुढील तीन ते चार वर्षांत ५० हजार विजेवर चालणाऱ्या बसची गरज, मुंबई महापालिका एकटीच १० हजार बस खरेदी करणार

Gangapur News: गंगापुरात किरकोळ वादातून चाकूहल्ला; उपचारादरम्यान २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT