पुणे

पालिकेच्या ठेकेदारांची पीएफ विभागाकडून चौकशी 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेच्या ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्‍कम भरली आहे की नाही, याची चौकशी सुरू केली असून, त्यासंदर्भातील माहिती सादर करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहे. 

महापालिकेला जानेवारी 2011 ते डिसेंबर 2013 या तीन वर्षांच्या कालावधीत विविध विभागांतील कामे कोणत्या ठेकेदारांना दिली होती, त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्‍कम भरली आहे का, याची तपशीलवार माहिती भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने मागवली आहे. यासंदर्भात सुनावणी सुरू असून, ही माहिती सादर करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत. पालिका प्रशासनाने ही माहिती सादर करण्यात वेळकाढूपणा केला, तर भविष्यनिर्वाह निधी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे या विभागातील वरिष्ठ सूत्रांनी "सकाळ'ला सांगितले. 

दरम्यान, महापालिका आयुक्‍तांनी या कालावधीत कामे केलेल्या ठेकेदारांनी दिलेल्या वेतनाची (लेबर कॉस्ट) माहिती 31 जानेवारी 2018 पर्यंत लेखा विभागाकडे पाठवण्याची सूचना शहर अभियंता, सहशहर अभियंता, विकास अभियंता, मुख्य उद्यान अधीक्षक, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, मुख्य आरोग्य अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांना केली होता. मात्र, ती देण्यात न आल्याने दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान महापालिकेकडून ती सादर करण्यात आली नाही, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT