pimpri 
पुणे

पिंपरी: काळेवाडीत दोन दिवसांत 70 बेकायदा बांधकामांवर कारवाई 

रवींद्र जगधने

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागाने काळेवाडी येथील तापकीर मळा चौक ते गोडांबे चौक परिसरातील एकुण 39 अनधिकृत व्यावसायिक पत्राशेडवर शुक्रवारी (ता. 2) धडक कारवाई केली. गेल्या दोन दिवसांत 73 हजार 500 चौरस फुटांच्या एकूण 70 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. 

निळी रेषा व इतर खासगी जागेत महापालिकेची परवानगी न घेता उभारलेल्या 36 हजार 500 चौरस फुटांच्या एकूण 39 अनधिकृत व्यावसायिक पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. तर गुरुवारी 30 व्यावसायिक पत्राशेड व दोन हजार चौरस फुटांचे एक आरसीसी बांधकाम अशा अंदाजे 35 हजार चौरस फुटांच्या 31 बांधकामांवर कारवाई करण्यात आली. बांधकाम परवानगी व बेकायदा बांधकाम विभागाचे "ग' प्रभाग कार्यकारी अभियंता मनोज सेठिया, उपअभियंता रामनाथ टकले, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत कुंभार यांच्यासह दोन कनिष्ठ अभियंते, दहा बीट निरीक्षक, वाकड पोलिस ठाण्याचे 20 कर्मचारी व अधिकारी, तसेच महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पंधरा पोलिसांनी भाग घेतला. चार जेसीबी मशिन, एक गॅस कटर, 20 मजूर, अग्निशामक बंब व रुग्णवाहिनीची कारवाईत मदत घेण्यात आली. 

अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण? 
काळेवाडी परिसरात निळ्या रेषेतील जागा जागामालक भाड्याने देतात. त्यानंतर व्यवसायासाठी भाड्याने घेतलेला व्यक्ती त्या जागेवर पत्राशेड उभारतो. मात्र, जागा पूर रेषेत आहे का, याची तो महापालिकेकडून खात्रीही करत नाही. तसेच महापालिका व लोकप्रतिनिधीही याकडे डोळेझाक करतात. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. मात्र, दोन दिवसांत झालेल्या मोठ्या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. परंतु, या वाढणाऱ्या अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण? असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishnaraj Mahadik Statement : शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांची दिशाभूल; भाजप प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिकांचा राजू शेट्टी, सतेज पाटलांवर निशाणा

Nagpur News: एनएचएआयकडून वीज वाहिनीचे नुकसान ;२२ हजार नागरिक उकाड्याने त्रस्‍त

CRPF Constable Recruitment 2026 Last Date : कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख, ९१९५ सरकारी नोकऱ्यांसाठी असा करा अर्ज

अर्रर्रर्र खतरनाक! 'देवमाणूस' मध्ये मोठा ट्विस्ट; गोपाळला वठणीवर आणायला 'ती' येतेय; कोण आहे ती? नेटकऱ्यांनी ओळखलं...

Mumbai Indians ला शेवटच्या सामन्याआधी मोठा धक्का! शतकवीर खेळाडूसह युवा ऑलराऊंडर IPL 2026 मधून बाहेर

SCROLL FOR NEXT