कासारवाडी - भारतरत्न जेआरडी टाटा दुमजली उड्डाणपुलाच्या रॅंम्पच्या कामावरील स्थगिती न्यायालयाने उठविल्यावर काम पुन्हा सुरू झाले. 
पुणे

नाशिक फाटा येथील रॅम्पचे काम सुरू

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - नाशिक फाटा येथील जेआरडी टाटा उड्डाण पुलाचा रॅम्प बांधण्यासाठी दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठविली असून, त्याचे काम महापालिकेने पुन्हा सुरू केले आहे. हे काम मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होईल. रॅम्पवरील वाहतूक सुरू झाल्यानंतर त्याचा फायदा पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, सांगवी या परिसरातील वाहनचालकांना होईल. 

याबाबत महापालिकेच्या बीआरटीएस विभागाचे प्रवक्ते विजय भोजने म्हणाले, ‘‘जागामालकाने न्यायालयात याचिका दाखल केल्याने या कामाला स्थगिती मिळाली होती. उच्च न्यायालयाने तो स्थगिती आदेश सोमवारी उठविला. रॅम्पचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. राहिलेले काम येत्या महिनाभरात पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर वाहतूक पोलिस विभाग, तसेच महापालिकेचे पदाधिकारी यांच्या परवानगीनंतर या रॅम्पवरून वाहतूक सुरू करण्यात येईल.’’

नाशिक फाटा येथील दुमजली उड्डाण पुलासाठी सुमारे शंभर कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, त्याच्या रॅम्पसाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हा चौक ‘सिग्नल फ्री’ करण्याचे नियोजन आहे.

त्यामुळे पुण्याहून पिंपरीकडे ये-जा करताना या चौकात वाहनांना थांबावे लागणार नाही. भोसरीकडून पिंपरीकडे येणाऱ्या वाहनचालकांना उड्डाण पुलावरून कासारवाडी स्थानकाच्या पलीकडे जावे लागेल आणि तेथून वळून पुन्हा उड्डाण पुलावरून रॅम्पमार्गे पिंपरीकडे यावे लागेल. 

दरम्यान, मेट्रो रेल्वेसाठी या रॅम्पलगतच खांब उभारण्यात येणार आहेत. त्याचे काम येत्या काही दिवसांत सुरू झाल्यास येथील वाहतुकीच्या नियोजनात काही बदल करावे लागतील. त्या संदर्भात निर्णय झाल्यानंतरच वाहतूक पोलिस विभाग येथील ‘सिग्नल फ्री’ चौकाच्या नियोजनाकडे लक्ष देईल, असा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT