वाकड फाटा - महापालिकेतर्फे बांधण्यात येणारा आणि पूर्णत्वाच्या मार्गावर असलेला वाय जंक्‍शन मार्ग. 
पुणे

‘वाय जंक्‍शन’ एप्रिलमध्ये खुला

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी वाकड फाट्याजवळ विकसित करण्यात आलेला भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत महापालिकेने दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता पाच महिन्यानंतरही झालेली नाही. त्यामुळे ‘भुयारी मार्गाला मुहूर्त कधी मिळणार?, असा प्रश्‍न रोजच्या वाहतूक कोंडीला वैतागलेले नोकरदार विचारत आहेत. दरम्यान, प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती बीआरटी विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली. 

‘वाकड रोड’ म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता हिंजवडी उड्डाण पुलाजवळ पुणे-बंगळूर म्हणजेच कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गाला जाऊन मिळतो. त्यामुळे या रस्त्यावर प्रवासी तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांनी अखंडपणे वर्दळ सुरू असते. औंध-सांगवी परिसरात राहणारे आयटीयन्सदेखील हिंजवडीकडे जाण्यासाठी या मार्गाला प्राधान्य देतात. साहजिकच गेल्या काही वर्षांपासून या मार्गावरील वाहतुकीचा ताण वाढल्याने तो अपुरा पडू लागला होता. परिणामी, वाहतूक कोडीचा प्रश्‍न गंभीर झाला होता. 

नागरिकांची या वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी आराखडा तयार करून महापालिकेच्या बीआरटी विभागाने २०१६ मध्ये भुयारी मार्गाचे प्रत्यक्ष काम हाती घेतले. दीड वर्षाच्या मुदतीत ते पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाची तीन टप्प्यांत विभागणी करण्यात आली. ऑक्‍टोबर २०१७ पर्यंत प्रकल्पाचे पहिले दोन टप्पे म्हणजेच सेवा रस्ते व जगताप डेअरीकडील रॅंपचे काम पूर्ण होऊन, औंध दिशेकडील काम हाती घेण्यात आले होते. कामाचा वेग लक्षात घेऊन पुढील दोन ते तीन महिन्यांत भुयारी मार्ग पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्‍वासन महापालिकेकडून देण्यात आले. त्याला पाच महिने उलटूनही तो खुला न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: ‘गोकुळ’ फॅक्टर तोडण्याचे भाजपपुढे तगडे आव्हान; शिक्षक, पदवीधर निवडणूक: ॲक्टिव्ह शिवसेना अन्‌ सायलेंट राष्ट्रवादीची डोकेदुखी

HARDIK PANDYA FAN: १००० किमी पायी चालत हार्दिक पंड्याला भेटायला पोहोचला चाहता! भारतीय स्टारने दिला असा प्रतिसाद, VIDEO चर्चेत

Gokul Election Result : 'गोकुळ'च्या निकालाने मंडलिक-मुश्रीफ वादाला उकळी! वीरेंद्र मंडलिक 'इन', नविद 'आउट; वाचा हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या पराभवामागची Inside story

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट, दसरा मेळावा साधेपणाने : मंत्री सरनाईक

Shoumika Mahadik Gokul Election : शौमिका महाडिकांना गोकुळमधील पराभव जिव्हारी; सोशल मीडियावर पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT