Pimple-Saudagar 
पुणे

प्लॅस्टिकमुक्त पिंपळे सौदागर फेरीला नागरीकांचा प्रतिसाद

मिलिंद संधान

नवी सांगवी : रोजलँड सोसायटी, नवचैतन्य ग्रुप आणि सिनियर सिटीझन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या प्लॅस्टिकमुक्त पिंपळे सौदागर' या मोहिमेला पिंपळे सौदागरवासीयांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने रविवारी (ता. १०) रोजी परिसरात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, यशदा रियाल्टी ग्रुप व्हा. चेअरमन संजय भिसे, रोजलँड सोसायटी चेअरमन संतोष मस्कर, पिंपळे सौदागर मधील विविध सोसायटीचे कमिटी मेंबर्स, सिनियर सिटीझन असोसिएशन मेंबर्स, चैतन्य हास्य क्लब सदस्य, महिला आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

यांच्यासह परिसरातील नागरिक, व्यापारी सहभागी झाले होते. १ जानेवारीपासून प्लॅस्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशवीचा वापर करण्याचा संकल्प पिंपळे सौदागरवासीयांनी केला असून या संकल्पाबाबत जनजागृती करण्यासाठी रविवारी सायकांळी साडेचार वाजता नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांच्या नेतृत्वाखाली गोविंद गार्डन ते शिवार गार्डन अशी रॅली काढण्यात आली. यामध्ये विविध गृहप्रकल्पातील नागरिक, दुकानदार, महिला, आबालवृद्ध सहभागी झाले होते. ‘प्लॅस्टिकमुक्त पिंपळे सौदागर’ व ‘से नो टू प्लॅस्टिक बॅग’ असे फलक घेऊन जनजागृती करण्यात आली. रस्त्यात भेटणा-या प्रत्येक नागरिकाला, दुकानदरांना १ जानेवारी २०१८ पासून प्लॅस्टिक बॅगचा वापर बंद करुन नियमीतपणे कापडी पिशवी वापरण्याचे आवाहन केले. 

नवीन वर्षात दुकानात खरेदीसाठी जाताना कापडी पिशवी घेऊन जायची. एखादा दुकानदार प्लॅस्टिक पिशवीत सामान देत असेल तर त्याला नम्रपणे रोखायचे अशा प्रकारची ही संकल्पना आहे. यासाठी पिंपळे सौदागर येथील विविध सोसायट्यांचे प्रतिनिधी, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व दुकानदार यांनी बैठक घेऊन सर्वांनी मिळून प्लॅस्टिक बंदीचा संकल्प केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT