पुणे

‘बोन्साय’चे अनोखे विश्‍व अनुभवण्याची संधी

सकाळवृत्तसेवा

पुणे - पिंपळाच्या पानाच्या आकारात साकारलेले, एक मीटर उंचीचे आणि सर्वांत जुने दीडशे वर्षांचे उंबर, तीन इंच उंचीचे सर्वांत लहान बोन्साय अशा असंख्य प्रजातींचे बोन्साय वृक्ष; यांसह इटली, जपान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका अशा जवळपास १६ देशांमधील बोन्साय कलाकारांचा सहभाग असणारे अनोखे प्रदर्शन आणि त्यानिमित्त आयोजित जागतिक बोन्साय परिषद येत्या गुरुवारपासून (ता. २२) सुरू होत आहे. बोन्साय कलाकार प्राजक्ता काळे यांनी तयार केलेले तब्बल एक हजार बोन्साय वृक्ष प्रदर्शनात मांडण्यात येणार असून प्रदर्शनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

या प्रदर्शनात दहा विभागांमध्ये ‘मामे’, ‘शोहीन’, ‘स्मॉल बोन्साय’, ‘मीडियम बोन्साय’, ‘लार्ज’ आणि ‘एक्‍स्ट्रॉ लार्ज बोन्साय’ अशा अनेक प्रकारच्या बोन्सायचा समावेश असणार आहे. प्रदर्शनाच्या उद्‌घाटनानिमित्त दुर्गा जसराज यांची निर्मिती असलेला ‘पंचतत्त्व’ हा विशेष कार्यक्रम नागरिकांना पाहता येईल. कार्यक्रमात पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पाच तत्त्वांची वैशिष्ट्ये कलाविष्कारातून उलगडणार आहेत. उस्ताद रशीद खाँ (गायन), पं. विश्‍वमोहन भट (मोहनवीणा), प्रवीण गोडखिंडी, पं. शशांक सुब्रह्मण्यम, सेल्वा गणेश, तौफिक कुरेशी, पं. श्रीधर पार्थसारथी, पं. रतन मोहन शर्मा, अंकिता जोशी, पं. विजय घाटे, मुकुंद पेटकर हे नामवंत कलाकार सादरीकरण करणार  आहेत.

शरद पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन 
‘बोन्साय नमस्ते’ या पहिल्या जागतिक बोन्साय परिषदेचे उद्‌घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २२) होणार आहे. सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ‘इंडियन बॅंक’चे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी किशोर खरात, ‘बॅंक ऑफ महाराष्ट्र’चे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, ‘टाटा कॅपिटल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी प्रवीण कडले, ‘महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस’चे व्यवस्थापकीय संचालक रमेश अय्यर उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT