Ramdas Jagtap 
पुणे

ऑनलाइन सातबारा मार्चअखेर पूर्ण होणार

युनुस तांबोळी

टाकळी हाजी : सातबारा तलाठयांच्या डिजीटल सहीने घर बसल्या मिळावा यासाठी महसूल विभागात युदध पातळीवर काम सुरू आहे. या कामाला अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली असून , आता 31 मार्च पर्यत सातबारा आनलाईन करण्याचे उद्दिष्ट दिले असल्याची माहिती ई-फेरफार चे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली. 

जांबूत ( ता. शिरूर ) येथील सांसद आदर्श ग्रामच्या कामाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. जगताप म्हणाले की, 2002 पासून राज्यात सातबारा संगणकीयकृत करण्यात आला आहे. 23 फेबुवारीपर्यत राज्यातील 43 हजार 949 गावांपैकी 33 हजार 161 गावांतील सातबारा 76 टक्के आनलाईन झाला आहे. खातेदारांना सातबारा मिळण्यासाठी तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. त्य़ामुळे सातबारा संगणकीयकृत करण्याचे ठरले.

यातही मोठ्या प्रमाणात चुका झाल्याचे आढळून आले. त्यामुळे शेतकऱ्यांना अचूक संगणकीयकृत सातबारा देण्यासाठी केंद्र पुरस्कृत डिजीटल इंडिया लँड रेकॅार्ड मॅाडर्नायझेशन प्रेाग्राम राज्यात कार्यान्वीत करण्यात आला. त्या अंतर्गत पुण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने ई-फेरफार ची प्रणाली विकसित करण्यात आली. त्याआधारे राज्यात ई-फेरफार करून महाराष्ट्र जमीन महसून अधिकार अभिलेख नोंद वह्या तयार केल्या जात आहे. राज्यातील महसून यंत्रणेला सातबाराचा सर्व्हे नंबर योग्य प्रकारे लिहिणे. अचूक संगणकीय कृत  सातबारा व 8 अ साठी 24 मुद्दयांवर तपासणी केली जात आहे.

अमरावती विभागात शंभर टक्के काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे या भागातील गावांना आनलाईन सातबारा मिळू लागला आहे. सोलापूर जिल्हा 906, सांगली 483, पुणे जिल्ह्यात 836, सातारा जिल्हा 514, कोल्हापूर 167 गावात सातबारा संगणकीकृत करण्यात आले आहे. 

राज्यात 31 मार्च पुर्वी सातबारा संगणकीकृत करण्याचे उद्दिष्ट दिले गेले आहे. सध्या अमरावती विभागातील अकोला, वाशीम, औंरगाबाद मधील उस्मानाबाद आणी जालना जिल्ह्यात शंभर काम पुर्ण झाले आहे. बुलठाणा, लातूर, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा जिल्ह्यात 99 टक्के संगणकीकृत सातबारा करण्याचे काम पुर्ण झाले असल्याचे जगताप यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT