crime 
पुणे

नवरदेवाच्या खोलीतून दोन लाखांची रोकड लंपास

संदिप घिसे

पिंपरी : मंगल कार्यालयातील नवरदेवाच्या खोलीतून दोन लाखांची रोकड चोरीस गेली आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे परिसरात मंगळवारी (ता. १३) घडली.

याबाबत सविस्तर माहिती कि, काळेवाडी येथील राजेंद्र महाडिक यांचा मुलगा रविंद्रचा विवाह सोहळा ताथवडे येथील रघुनंदन मंगल कार्यालयात मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता होता. केटरिंग, मंगल कार्यालयाचे भाडे, बँडवाले यासह इतर खर्चाकरिता महाडिक यांनी दोन लाखाची रोकड सोबत आणली होती. ही रोकड त्यांनी पत्नीकडे दिली होती.

पत्नीने ही रोकड पर्समध्ये ठेवून त्या नवरदेवाच्या खोलीत बसल्या होत्या. दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास काही कामाकरिता त्या खोलीबाहेर गेल्या. या दरम्यान एका दहा ते बारा वर्षाच्या मुलाने नवरदेवाच्या खोलीतून दोन लाखांची रोकड असलेली पर्स चोरून नेली. ही घटना सीसी कँमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT