Mahavitaran
Mahavitaran 
पुणे

353 रुपयांच्या 'लेट फी'साठी पाण्याचा वीज पुरवठा खंडीत

राजेंद्रकृष्ण कापसे

कोंढवे धावडे (पुणे) : तुमच्या मीटरची थकबाकी आहे. ती न भरल्यामुळे असे सांगत शिवणे, कोंढवे धावडे, प्रादेशिक पाणी पुरवठा केंद्राचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. याबाबत अधिक चौकशी केली असता 1 लाख 66 हजार रुपयांच्या वीज बिलाचा धनादेश उशिरा जमा झाल्याने त्याचे 353 रुपयांची थकबाकी होती. त्या बदल्यात ही कारवाई केली. 

'ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी' ऊर्जा मंत्री चंद्रकांत बावनकुळे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार प्रयत्न करीत आहेत परंतू कोथरुड, वारजे येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक व खोडसाळपणाने घेतलेल्या भूमिकेचा या परिसरातील ग्रामस्थ निषेध करीत आहेत. पाणी पुरवठा ही अत्यावश्यक सेवा आहे. लेट फी पुढील बिलात दाखविता आली असती. परंतु, कोणतीही पूर्व सूचना न देता. पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी पुरावे दिल्यानंतर ही दुर्लक्ष करीत वीज पुरवठा खंडित केला.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शिवणे, कोंढवे धावडे, उत्तमनगर व न्यू कोपरे गावासाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे. सव्वा लाख नागरिक यावर अवलंबून आहेत. 
वेळेत वीज बिल भरले जात असल्याने मागील पाच वर्षात एकदा सुद्धा वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ आली नाही. एक लाख 66 हजार रुपये बिलाची मुदत 17 जानेवारी होती. प्राधिकरणाने 15 जानेवारी तारीख असलेला धनादेश दिला. तो 18 जानेवारीला वठला. तो धनादेश उशीरा जमा झाला. त्याची लेट फी आहे ती तातडीने भरावी लागेल अशी कोणतीही माहिती महावितरणने 18जानेवारी नंतर 9 फेब्रुवारीपर्यंत दिली नाही. 9 फेब्रुवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता महावितरणचा कर्मचारी आला. त्याच्या वरिष्ठ अभियंत्याना आम्ही बिल भरल्याची पुरावे दिले. परंतु त्याने सहा वाजता वीज पुरवठा खंडित करून गेला. याबाबत प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी सांगितले.

त्यानंतर, प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी आमदार भीमराव तापकीर यांना माहिती दिली. त्यांनी कोथरुडचे महावितरणचे कार्यकारी अभियंता बारटक्के व सहायक कार्यकारी अभियंता सावंत यांना फोन वरून फैलावर घेत वीज जोडणी करण्यास सांगितले. दरम्यान, याबाबत माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, उत्तमनगरचे माजी उपसरपंच सुभाष नानेकर यांनी देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन केला. तरी देखील वीज पुरवठा पूर्ववत केला नाही. 
दरम्यान,  प्राधिकरणाच्या वतीने शिवणे केंद्रावर वीज बिल भरण्यास सहा वाजता माणूस आला. परंतू तेथे बिल भरून घेण्यास कोणी नव्हते. अखेर ते बिल भरण्यासाठी आठ किलोमीटर वरील डहाणूकर कॉलनीत जाऊन बिल भरण्यास सांगितले. येथे आणखी 1908 रुपये लेट फी लावून 2261 रुपये रात्री आठ वाजता भरल्यानंतरच रात्री नऊ वाजता वीज पुरवठा सुरू केला.

बील किंवा लेटफी संदर्भात आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून बिलाच्या रक्कमेचा धनादेश घ्याव्या लागतो. तरी देखील किरकोळ रक्कम भरली. असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

महावितरणची कृती 100टक्के बेकायदेशीर 
"बिलाची लेट फी ही पुढील बिलातमध्ये दिली पाहिजे. तसेच, वीज कायदा 56 नुसार कोणाची, कितीही थकबाकी असली तरी 15 दिवसाची लेखी स्वतंत्र नोटीस (वीज बिल नव्हे) दिल्याशिवाय वीज पुरवठा कट करता येत नाही. महावितरणााने केलेली कृती 100 टक्के बेकायदेशीर आहे.", असे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT