fire 
पुणे

रहाटणीतील गणेश बँकेला आग; कागदपत्रे जळून खाक

संदीप घिसे

पिंपरी : रहाटणी येथील गणेश बँकेला लागलेल्या आगीत कागदपत्रे जळून खाक झाली. ही घटना शनिवारी (ता.२४) पहाटे पाचच्या सुमारास घडली.

अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ४.५७ वाजता संजय बाईत या नागरिकाने अग्निशामक दलास आगीची वर्दी दिली. त्यानुसार रहाटणी अग्निशामक उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी अवघ्या काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत बँकेची चलन व इतर कागदपत्रे जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे अग्निशामक दलाच्या सूत्रांनी सांगितले.
 बँकेच्या वर निवासी इमारत असल्याने येथील रहिवाशांमध्ये आगीमुळे एकच घबराट उडाली.

अग्निशामक दलाचे भाऊसाहेब धराडे, नारायण तापकीर, शिवाजी ताकवले, मोहन चव्हाण, विकास नाईक यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT