sangavi 
पुणे

शिवसृष्टी उद्यानातील नवीन खेळणी बालचमुंसाठी खुली

रमेश मोरे

जुनी सांगवी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जुनी सांगवी येथील शिवसृष्टी उद्यानात बसविण्यात आलेली नविन खेळणी बालचमुंसाठी खुली करण्यात आली. या उद्यानात शिवाजी महाराजांचा बालपणापासूनचा इतिहास शिल्पांमधून साकारलेला आहे. याच बरोबर येथे पिंपरी चिंचवड शहरातील मोठे आध्यात्मिक ध्यान धारणा केंद्र या उद्यानात आहे. 

सांगवीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवसृष्टी उद्यानात नेहमीच गर्दी असते. मात्र येथे, बालचमुंसाठी आजवर खेळणी बसविण्यात आलेली नव्हती. खेळणी नसल्याने मुलांना हिरवळीवर इतर खेळ खेळण्यांशिवाय पर्याय नव्हता. यामुळे बच्चे कंपनीचा हिरमोड व्हायचा. नुकतीच महापालिकेच्या वतीने येथे मल्टिअॅक्टिव्हिटी प्ले सिस्टम अंतर्गत घसरगुंडी, नेट, क्लँबर, स्विंग, मेरिगो राऊंड, सिसॉ अशा एकत्रित खेळण्यांचा संच बसविण्यात आला आहे. सोमवारी (ता. 29) भाजपा महिला आघाडी प्रदेश सदस्य तथा जेष्ठ नगरसेविका माई ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन करून हा खेळण्यांचा संच बालचमुंसाठी खुला करण्यात आला.

यावेळी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे, मनोहर ढोरे, बाळासाहेब बामणे पाटील उद्यान अधिकारी जे.व्ही.पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगरसेवक हर्षल ढोरे म्हणाले, सांगवीतील जुन्या नव्या सर्वच उद्यानामधील नादुरूस्त खेळणी बदलण्याचे काम करण्यात येत आहे. याचबरोबर इतर उद्यांनांची रंगरंगोटी करण्यात आली आहे. तर शहर सुधारणा समिती सदस्य संतोष कांबळे म्हणाले, सांगवीतील मध्यवर्ती भागातील हे प्रमुख व सुंदर उद्यान आहे. ध्यान धारणा केंद्र व शिवशिल्प असणाऱ्या शिवसृष्टीत आता खेळणी बसविल्याने उद्यान परिपूर्ण झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT