pimpri 
पुणे

भोसरीत जमिनीतून येते उकळते पाणी

संदिप घिसे

भोसरी - येथील सहल केंद्रातील साचलेले पाणी अचानक उकळू लागल्याची बातमी भोसरी आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पसरल्याने ही घटना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. दुपारी साडेबारानंतर पालिकेच्या विद्युत विभागाने या पाण्याखालची विद्युत केबल शोधली. ही केबल तीन वर्षांपासून वापरात नसल्याची माहितीही दिली. मात्र, महावितरणद्वारे या केबलसाठीची आर्थिंग कमकुवत झाल्यास केबलमधून विद्युत प्रवाह वाहण्याचीही शक्‍यता महापालिकेच्या तारतंत्रीने व्यक्त केली. विद्युत विभागाने या बाबींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यटकांनी केली.   

 सहल केंद्रात साचलेल्या पाण्यामधून वाफा निघत असल्याचे सोमवारी (ता. १२) सकाळी उघड झाले. देखरेखीसाठी नियुक्‍त केलेल्या संदीप माने यांनी ही माहिती दिली. माने यांनी पालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ ही माहिती दिली. मात्र, अधिकाऱ्यांनी सहल केंद्रास भेट दिली नाही. मंगळवारी (ता. १३) ही बाब सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अधिकारी जागे झाले व त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पाण्यातून वाफा येत असल्याचे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. मात्र, अनेकांनी तिकिट न काढताच केंद्रात प्रवेश केला. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडाले. दुपारी साडेबारानंतर उकळते पाणी बंद झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. पण, संध्याकाळपर्यंत नागरिकांची संख्या वाढतच होती. ई-क्षेत्रीय अध्यक्षा भीमाबाई फुगे, नगरसेवक ॲड. नितीन लांडगे, पिपंरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पोपटराव फुगे आदींनीही भेट देऊन पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पाचारण केले. 

मग पाणी कसे उकळले?
तीन वर्षांपूर्वी सहल केंद्र आणि शेजरीच असलेली विद्युत दाहिनीसाठी एकाच डीपी बॉक्‍समधून वीजजोड दिले होते. विद्युत दाहिनीत शव आल्यावर त्यास अग्नी देण्यासाठी दाहिनीसाठी अधिक दाबाचा विद्युत प्रवाह लागतो. त्यामुळे सहल केंद्राचा विद्युत प्रवाह बंद करावा लागत असे. असे नेहमीच होत असल्याने महावितरणने सहल केंद्राला स्वतंत्र डीपीमधून वीजजोड दिला. त्यानंतर सहल केंद्रातील घटनास्थळी असलेल्या विद्युत केबलमधून प्रवाह बंद करण्यात आला होता.

सहल केंद्रातील विद्युत केबलमधील प्रवाह तीन वर्षांपासून बंद आहे. मात्र, महावितरणच्या केबलच्या आर्थिंगमध्ये बिघाड झाल्याने केबलमधून प्रवाह वाहण्याची शक्‍यता आहे. घटनास्थळी नागरिकांनी पाण्यामध्ये हातही घातले आहेत. तरीही त्यांना विजेचा धक्का बसला नाही. त्यामुळे केबलमधील विद्युत प्रवाह बंद असल्याचे स्पष्ट होते.
- अशोक नाईक, विद्युत तारतंत्री, विद्युत विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poland Crisis: पोलंडमध्ये सत्तापालटाच्या हालचाली? अध्यक्षांवर दौरा अर्धवट टाकून विमान माघारी वळविण्याची वेळ का आली?

Mumbai Local: मुंबई लोकलचा पुन्हा खोळंबा! हार्बर मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड, वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ घाटाला भेट

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये टेक्निकल आणि ड्रायव्हर पदांची भरती; दहावी पास अन् ITI धारकांसाठी नोकरीची सुवर्ण संधी!

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील रास्ता रोकोआधी शेतकरी नेते स्थानबद्ध; नांदूर-मधमेश्वरच्या पाण्यासाठी आंदोलन

SCROLL FOR NEXT